पुणे-सातारा महामार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात; यात 4 प्रवाशांचा जागीच मृत्यू
वरवे गावच्या हद्दीत दोन कंटेनर व एक शिवशाही व आराम बस यांच्यात विचित्र अपघात,चार जणांचा मृत्यू
पुणे माझा न्युज नेटवर्क : नसरापूर : -पुणे सातारा राष्ट्रीय महामार्गावर वरवे ता. गावच्या हद्दीत दोन कंटेनर व एक शिवशाही व आराम बस यांच्या झालेल्या विचित्र अपघातात दोन जण जागीच ठार झाले असून मृतात एका नऊ वर्षीय मुलीचा समावेश आहे.
ऋतुजा रवींद्र चव्हाण वय ९ खडकमाळ, उत्तमनगर व खाजगी बसचा चालक शिवराज कुमार एच आर रा. होसैहळ्ळी कर्नाटक या दोघांचा अपघातात मृत्यू झाला असुन सुनंदा रवींद्र चव्हाण वय ४२ खडकमाळ, उत्तमनगर,रत्ना रवींद्र पुजारी वय ३८, रवींद्र रामा पुजारी वय ४१ ( दोघेही रा. ठाणे मुंबई), विना प्रभाकर गौडा वय ३४, ज्योती जयराम गौडा वय ३९, पर्वतमा देवे गौडा वय ४२, हेमा अण्णा गौडा वय ३५ सर्व रा. मुंबई मिनाक्षी मायशेट्टी गौडा वय ३५, संजु रवी गौडा, वय २४, प्रदीप नज्जाप्पा गौडा वय २५ अशी जखमीचे नावे असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
पुणे सातारा महामार्गावर वरवे ता. भोर येथे रविवारी सकाळी आठ वाजण्याचा सुमारास घडली आहे. कर्नाटक येथुन आलेली खाजगी श्रीकृष्ण ट्रॅव्हल ची बस क्र. के ऐ ५१ ए एफ ५७०७ पुणे बाजूकडे जात असताना प्रवाशांना नाष्टासाठी लक्झरी बसने सेवा रस्त्यावर डाव्या बाजूस युटर्न मारत असताना पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने एम एच ४६ ऐ के ६३०९ जोरदार धडक दिल्याने लक्झरी बस महामार्गावर जागीच पलटी झाली.
यात लक्झरी चालक शिवराज कुमार जागीच ठार झाला. तर धडक दिलेला कंटेनर हा सातारा बाजूकडे जाणाऱ्या दिशेने महामार्गावर घुसला. व पुणे बाजूकडून येणाऱ्या कंटेनर क्र. एम एच ०४ एच वाय ०२७९ ला धडकला व तो कंटेनर शेजारून जाणाऱ्या शिवशाही बस क्र. एम एच ०९ ई एम १३८० ला धडकला. व शिवशाही बस मधील नऊ वयाची मुलगी क्रुतुजा गंभीर जखमी होऊन मृत्यू पावली.
अपघात होताच राजगड पोलीस, महामार्ग पोलीसांनी धाव घेतली. तीन क्रेन च्या साह्याने अपघातातील वाहने बाजूला करून जखमींना पाच रुग्णवाहिका मधुन जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अपघाताने वाहतूक कोंडी झाली होती, तब्बल तीन तासांनी वाहतूक सुरळीत करण्यात आली. यावेळी महामार्गाच्या दुतर्फा वाहनाच्या लांब रांगा लागल्या होत्या. जखमीवर नसरापूर, शिवापूर व कापुरव्होळ येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
प्रभाकर गौडा वय ३४, ज्योती जयराम गौडा वय ३९, पर्वतमा देवे गौडा वय ४२, हेमा अण्णा गौडा वय ३५ सर्व रा. मुंबई मिनाक्षी मायशेट्टी गौडा वय ३५, संजु रवी गौडा, वय २४, प्रदीप नज्जाप्पा गौडा वय २५ अशी जखमीचे नावे असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. पुणे सातारा महामार्गावर वरवे ता. भोर येथे रविवारी सकाळी आठ वाजण्याचा सुमारास घडली आहे.
कर्नाटक येथुन आलेली खाजगी श्रीकृष्ण ट्रॅव्हल ची बस क्र. के ऐ ५१ ए एफ ५७०७ पुणे बाजूकडे जात असताना प्रवाशांना नाष्टासाठी लक्झरी बसने सेवा रस्त्यावर डाव्या बाजूस युटर्न मारत असताना पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने एम एच ४६ ऐ के ६३०९ जोरदार धडक दिल्याने लक्झरी बस महामार्गावर जागीच पलटी झाली.
यात लक्झरी चालक शिवराज कुमार जागीच ठार झाला. तर धडक दिलेला कंटेनर हा सातारा बाजूकडे जाणाऱ्या दिशेने महामार्गावर घुसला. व पुणे बाजूकडून येणाऱ्या कंटेनर क्र. एम एच ०४ एच वाय ०२७९ ला धडकला व तो कंटेनर शेजारून जाणाऱ्या शिवशाही बस क्र. एम एच ०९ ई एम १३८० ला धडकला. व शिवशाही बस मधील नऊ वयाची मुलगी कुतुजा गंभीर जखमी होऊन मृत्यू पावली.
अपघात होताच राजगड पोलीस, महामार्ग पोलीसांनी धाव घेतली. तीन क्रेन च्या साह्याने अपघातातील वाहने बाजूला करून जखमींना पाच रुग्णवाहिका मधुन जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताने वाहतूक कोंडी झाली होती तब्बल तीन तासांनी वाहतूक सुरळीत करण्यात आली. यावेळी महामार्गाच्या दुतर्फा वाहनाच्या लांब रांगा लागल्या होत्या. जखमीवर नसरापूर, शिवापूर व कापुरव्होळ येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
वरवे चे मा. उपसरपंच महेंद्र भोरडे यांनी प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले की,आज वरवे येथील हायवे वर खुप मोठा अपघात झाला .अनेक निष्पाप लोकाचे जीव गेले याला जबाबदार कोण ?याला जबाबदार प्रशासन व नेते मंडळी आहेत. भोर तालुक्यातून जाणाऱ्या या हायवेचे काम आजपर्यंत पुर्ण होत नाही. पंचक्रोशीतील अनेक निष्पाप नागरिकांनी जीव गमावले आहेत .
आम्ही अनेक वेळा निकृष्ट दर्जा व या वेळ काढून कामाची चौकशी करा, म्हणून संबंधितांना पत्रव्यवहार केला. पण त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आज आपण जाऊन पाहिले तर पुलाचे काम अर्धवट आहे .भोर तालुक्यातील उच्च स्थानावर बसणाऱ्या लोकप्रतिनिधी अधिकारी यांनी याकडे गांभीर्यपूर्वक पाहणे गरजेचे आहे .भोर तालुक्यातून जाणाऱ्या प्रत्येक गाव शिवेवर उडान पूल होणे सर्व रस्त्यांची कामे टोल नाका बंद होणे गरजेचे आहे,पण शोकांतिका ही आहे ,काहीच होणार नाही या तालुक्यात
No comments:
Post a Comment