तक्रारदार यांनी केले येरवडा पोलिसांचे कौतुक..
पुणे माझा न्युज । प्रतिनिधी : शनिवार दिनांक १० जून रोजी एक महिला रिक्षामधून प्रवास करत असताना आपल्या हातातील बॅग रिक्षातच विसरून गेली काही वेळाने लक्षात येताच त्या महिलेने येरवडा पोलीस स्टेशन गाठले आणि मदत मागितली पोलिसांच्या माहिती नुसार महिला नाव रजिया शहाबुद्दीन शेख ह्या सह्याद्री हॉस्पीटल ते मेंटल हॉस्पीटल दरम्यान प्रवास करुन उतरल्या नंतर त्यांची बॅग रिक्षा मध्ये विसरून गेले त्या बॅगेत एक तोळ्याचे सोन्याचे गंठण व ३५ हजार रुपये रोख रक्कम असा ९० हजार किमतीचा मुद्देमाल विसरून राहिला होता
तक्रारदार पोलीस स्टेशनला आलेनंतर तत्काळ तपास पथकाचे अधिकारी अंकुश डोंबाळे यांचे मार्गदर्शनाखाली अंमलदार पोहवा दत्ता शिंदे व तुषार खराडे यांनी सीसीटीव्ही फुटेज पहिले असता सीसीटीव्ही फुटेज मध्ये महिला ज्या रिक्षाने प्रवास करत होत्या त्या रिक्षाचा क्रमांक मिळाल्यानंतर सदर रिक्षा चालकाचा शोध घेण्यास पथक रवाना करून रिक्षा चालकाचा शोध घेऊन सदर तक्रारदार महिलेस त्यांचे गहाळ झालेली बॅग एक तोळ्याचे सोन्याचे गंठण व ३५ हजार रुपये रोख रक्कम मुद्देमालासहित परत देण्यात आली याबाबत तक्रारदार महिलेने येरवडा पोलिसांचे तोंडभरून कौतुक केले
सदरची कामगिरी श्री शशिकांत बोराटे पोलीस उपआयुक्त परीमंडळ ४, श्री. किशोर जाधव सहा. पोलीस आयुक्त येरवडा विभाग श्री. बाळकृष्ण कदम वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री जयदीप गायकवाड पोलीस निरीक्षक गुन्हे, येरवडा यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोउपनि अंकुश डोंबाळे, पोहवा गणपत ठिकोळे, दत्ता शिंदे, तुषार खराडे, पोना अमजद शेख, अनिल शिंदे यांनी केलेली आहे.
No comments:
Post a Comment