PUNE CRIME NEWS | चुहा गॅंगचा मुख्य सूत्रधार भारती विद्यापीठ पोलिसांच्या जाळ्यात; भारती विद्यापीठ पोलिसांची कौशल्यपुर्ण कामगिरी - PUNE MAJHA NEWS

Breaking

Post Top Ad

 


Saturday, 24 June 2023

PUNE CRIME NEWS | चुहा गॅंगचा मुख्य सूत्रधार भारती विद्यापीठ पोलिसांच्या जाळ्यात; भारती विद्यापीठ पोलिसांची कौशल्यपुर्ण कामगिरी

चुहा गॅंगचा मुख्य सूत्रधार भारती विद्यापीठ पोलिसांच्या जाळ्यात; भारती विद्यापीठ पोलिसांची कौशल्यपुर्ण कामगिरी


पुणे माझा न्युज । प्रतिनिधी :
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुरनं 119/2023 महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा कलम 31(त्ट)3(2)3(4) या गुन्हयातील टोळी प्रमुख आरोपी साकीब मेहबुब चौधरी ऊर्फ लतिफ बागवान, वय 23 वर्षे, रा लुनिया बिल्डींग, चौथा मजला, कदम चाळ, संतोषनगर, कात्रज,पुणे हा दिनांक 16/02/2023 रोजी पासुन मिळुन येत नव्हता. टोळी प्रमुख आरोपी साकीब मेहबुब चौधरी ऊर्फ लतिफ बागवान, बय 23 वर्षे, रा लुनिया बिल्डींग, चौथा मजला, कदम चाळ, संतोषनगर, कात्रज, पुणे हा गुन्हा घडल्यापासुन फरार कालावधीत तो त्याचे अस्तीत्व लपवुन वारंवार वेगवेगळया जिल्हयांमध्ये त्यांची ओळख व ठाव ठिकाण बदलुन वास्तव करीत होता. त्याने त्यादरम्यान कात्रज अणि संतोषनगर परीसरात स्वताचे टोळीची दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत होता.


सदर आरोपीताचा भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी वारंवार बाहेरील जिल्हयामध्ये गुप्त बातमीदारांचे नेटवर्क सक्रीय करुन ब तांत्रिक विश्‍्लेषणावरुन शोध घेत असताना पोलीस अंमलदार विक्रम सावंत, अभिजीत जाधव, निलेश ढमढेरे यांना आरोपी साकीब मेहबुब चौधरी ऊर्फ लतिफ बागवान, हा मु.पो.निरा, ता.पुरंदर, जि. पुणे येथे राहत आहे अशी खात्रीशीर माहीती मिळाल्याने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी निरा, ता.पुरंदर, जि.पुणे येथे जावुन आरोपी साकीब मेहबुब चौधरी ऊर्फ लतिफ बागवान याचा शोध घेतला असता तो मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन पुढील कारवाई कामी गुन्ह्याचे तपासी अधिकारी श्री.नारायण शिरगावकर सो, सहाय्यक पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे यांचे ताब्यात देण्यात आले असुन त्यांनी सदर आरोपीतास अटक केली आहे.

आरोपी साकीब मेहबुब चौधरी ऊर्फ लतिफ बागवान हा रेकॉर्डवरील आरोपी असुन त्याचेवर यापुर्वी मोका कायदयांन्वये कारवाई करण्यात आली होती. त्या गुन्ह्यातुन त्यास जामीन मिळाल्यानंतर त्याने पुन्हा कात्रज भागात वर्चस्व प्रस्थापीत करण्याकरता त्यांचे साथीदारांनी पुन्हा त्यांची टोळी तयार करुन त्याने सदरचा गुन्हा केला आहे. विशेषता आरोपी साकीब मेहबुब चौधरी ऊर्फ लतिफ बागवान हा त्याचे टोळीचे वर्चस्व प्रस्थापीत करण्यासाठी कात्रज भागातील शिक्षण घेणारे बालकांचा वापर करुन त्यांचे टोळीची कात्रज भागात दहशत निर्माण करीत आहे.

सदरची कारवाई मा. प्रविणकुमार पाटील, अपर पोलीस आयुकत, पश्‍चिम प्रादेशीक विभाग, पुणे, मा. श्रीमती स्मार्तना पाटील सो मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ 2, मा. नारायण शिरगावकर सा, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विजय कुंभार , तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उप निरीक्षक सागर भोसले, पोलीस अंमलदार विक्रम सावंत, अभिजीत जाधव, निलेश ढमढेरे, चेतन गोरे, मंगेश पवार, हर्षल शिंदे, अवधुत जमदाडे, सचिन सरपाले, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, निलेश खैरमोडे, अभिनय चौधरी, अशिष गायकवाड, राहुल तांबे, यांच्या पथकाने केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Top Ad