पुणे माझा न्युज नेटवर्क । प्रतिनिधी पुणे : केंद्र सरकारने अंमली पदार्थांच्या धोक्याविरुद्ध लढण्यासाठी ‘ड्रग मुक्त भारत’ हा संकल्प निश्चित केला आहे. त्याचे पालन करण्यासाठी, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने १२ ते २६ जून २०२३ या कालावधीत “नशा मुक्त भारत पंधरवडा” जाहीर केला आहे. अंमली पदार्थांच्या (ड्रग्स) दुष्परिणामांबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी ‘नशा मुक्त भारत पंधरवडा’ अंतर्गत नशा मुक्त कोंढवाचे आयोजन कोंढवा पोलीस ठाण्याच्या वतीने जागतिक अंमली पदार्थ सेवन विरोधी दिनाचे औचित्य साधून जनजागृती करण्यासाठी संजय मोगले पोलीस निरीक्षक (गुन्हे) कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
सदर कार्यक्रमात मदरसा मधील मुलांना अंमली पदार्थ ( धूम्रपान ) व कुठलेही प्रकारचे व्यसन करू नये ते केल्यास शरीरास होणाऱ्या आजार व धोका याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच याबाबत प्रत्येकाने प्रयत्न करून आपला कोंढवा कसा नशा मुक्त करता येईल यावर मार्गदर्शन करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी मौलाना सुफी अन्वर व त्याचे सहकारी यात आवर्जून उपस्थित होते
No comments:
Post a Comment