गुन्हे शाखा युनिट १ ची उल्लेखनीय कामगिरी ! बाहेर गावांकडुन येणारे प्रवाश्यांना मारहाण करुन लुटणाऱ्यास अटक
पुणे माझा न्युज । प्रतिनिधी: दिवेसंदिवस प्रवाशांना लुटणे मारहाण करणे असे अनेक प्रकार आपणास पाहायला मिळत असतात पुण्यात असाच काही प्रकार शिवाजी नगर येथे एका प्रवासी सोबत घडला नाव अभिजीत गाडेकर रा. सिंहगड रोड पुणे हा संभाजीनगर सकाळी ५.३० या सुमा शिवाजी पुतळा चौकात शिवाजीनगर पुणे येथे बस मधुन उतरून राहते घरी जात असताना त्यास अज्ञात चार जणांनी मारहाण करून त्यांचेकडील बॅग व मोबाईल मारहाण करून जबरीने चोरुन घेवून गेले बाबत शिवाजीनगर पोलीस ठाणे गुरनं १०/२०२३ भादवि कलम ३९४-३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. याबाबत मा. वरिष्ठांनी दाखल गुन्हयांचा समांतर तपास करण्याबाबत आदेश देण्यात आले होते.
गुन्हे शाखा युनिट १ चे अधिकारी व अंमलदार सदर गुन्हयाच्या समांतर तपास करीत असताना पोलीस अंमलदार दत्ता सोनावणे यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की, शिवाजी मार्केट, चिकन मार्केट समोर कैम्प पुणे येथे दोन इसम मोबाइल विक्री करता येणार असून त्यांचेकडे चोरीचा मोबाईल आहेत. अशी बातमी प्राप्त झाल्याने लागलीच गुन्हे शाखा युनिट १ चे प्रभारी मा. पोनि श्री शब्बीर सय्यद युनिट गुन्हे शाखा पुणे यांनी टिम तयार करून शिवाजी मार्केट येथे चिकन सेंटरच्या समोर पुणे येथे मिळालेल्या बातमी प्रमाणे दोन इसम आल्यानंतर खात्री झाल्यानंतर त्यांना सदर ठिकाणी सापळा लावून सायं १८/४० वा छापा टाकून सदर इसमआहे त्यास्थितीत ताब्यात घेवून पंचा समक्ष त्यांना त्याचे नाव पत्ता विचारता त्यांनी आपली नावे १) संदीप सुनिल ठाकुर गय २१ वर्षे रा. वाल्मीकीनगर साईबाबा मंदीराजवळ रामटेकडी हडपसर पुणे २) हुसेन बावमिया वय २० वर्ष रा. विडीओ सेंटर गल्ली, बाबाजान चौक जवळील फुटपाथ लष्कर पुणे. असे सांगितले. तात्यांचेकडून हस्तगत केलेल्या वस्तूंमध्ये मिळून आलेल्या मोबाईल रु. ५०,०००/- एक विवो कंपनीचा मोबाईल व MI 20 Pro २०१८ चा माल घेवुन जागीच पंचनामा केला आहे. सदर इसमांना पुढील कारवाई कामी शिवाजीनगर पोलीस स्टेशन पुणे शहर यांचे पंचा समक्ष ताब्यात देण्यात आलेले आहे. पुढील तपास शिवाजी नगर पोलीस करत आहेत
No comments:
Post a Comment