कोंढवा पोलिसांकडून कौशल्य पूर्ण कारवाई; वाहन चोरी करणार्यास अटक, 5 गुन्हे उघडकीस
पुणे माझा न्युज | प्रतिनिधी : कोंढवा परिसरात वाहन चोरीचे गुन्हे करणार्या आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून वाहन चोरीचे 5 गुन्हे उघडकीस आले असून पोलिसांनी पाच लाख रूपये किंमतीची 5 वाहने जप्त केली आहेत. उघडकीस आलेले पाचही गुन्हे हे सन 2022 मधील आहेत
ईस्माईल शफी सय्यद (44, रा. लक्ष्मीनगर, गल्ली नं. 4, कोंढवा बु.) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी कोंढवा पोलिस स्टेशनमध्ये टाटा कंपनीचा टेम्पो चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल होता. चोरी गेलेल्या वाहनाचा सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल सुरवसे आणि त्यांच्या पथकातील पोलिस अंमलदार शोध घेत होते.पोलिसांनी घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. सन 2022 मध्ये आरोपीने वाहन चोरीचे गुन्हे केले होते. त्यामुळे पोलिसांचा ईस्माईल शफी सय्यद याच्यावर संशय निर्माण झाला.
कोंढवा पोलिसांनी आरोपीबाबत सखोल माहिती घेतली असता तो वाहन विकण्यासाठी ग्राहक शोधत असल्याचे पोलिस अंमलदार सुहास मोरे आणि राहुल थोरात यांना समजले. पोलिसांनी त्याचा शोध घेवुन त्याला दि. 8 मे 2023 रोजी अटक केली. न्यायालयाने आरोपीला पोलिस कोठडी सुनावली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे सखोल तपास केला असता त्याने वाहन चोरीचे गुन्हे केले असल्याची कबुली दिली. त्याच्याकडून 5 लाख रूपये किंमतीची 6 वाहने जप्त करण्यात आली.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे पोलिस निरीक्षक (गुन्हे) संजय मोगले, पोलिस निरीक्षक (गुन्हे) संदिप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल सुरवसे, पोलिस अंमलदार सुहास मोरे आणि राहुल थोरात यांच्या पथकाने ही कारवाई केली
No comments:
Post a Comment