कोंढवा पोलिस स्टेशनच्या हद्दीत किती तरी हॉटेल्स रेस्टॉरंट बारच्या नावाखाली हुक्का पार्लर चालू आहेत
पुणे माझा न्युज : प्रतिनिधी, कोंढवा :- कोंढवा हद्दीत कितीतरी हॉटेलमध्ये रेस्टॉरंट बारच्या नावाखाली हुक्का पार्लर चालू आहे. या सर्व हॉटेल बार रेस्टॉरटला रात्री 11 वाजेर्यंत परवानगी असते, तरी पहाटे 4 वाजेर्यंत चालू असतात. यामुळे अनेक लोक या हॉटेल चालक व पोलिसांना वैतागले आहेत अनेक तक्रारी करून देखील कोंढवा पोलीस कारवाई करण्यास अपयशी ठरत आहे काही दिवसांपूर्वी जी कारवाई झाली ती म्हणजे एकजण कारवाई करतो तर दुसरा हॉटेल्स चालू ठेवण्यासाठी दादागिरी करतो असाच प्रकार कोंढवा पोलिसांकडून केला जात आहे.
या नाईट लाईफमुळे गुन्हेगारी वाढत चालल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरु आहे गेल्या दोन दिवसांपूर्वी कोंढवा येथील पारगे नगर मध्ये पोलिसांमार्फत कारवाई करण्यात आली विशेष म्हणजे एकाही हॉटेल चालकावर गुन्हा किंवा खटला दाखल झाला नाही उलट त्या हॉटेल मध्ये आलेल्या ग्राहकांच्या दुचाकी ढकलून - पाडून पोलिसांकडून नुकसान करण्यात आले आहे वर्दीचा गैरवापर काही अधीकारी करताना दिसून आले आहे याबाबत वरिष्ठांकडे दाद मागण्यासाठी लवकरच शिष्ठमंडळ भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे तसेच येथील स्थानिक नागरिक पोलीस आयुक्तालय येथे धरणे आंदोलन देखील करणार असल्याचे सांगितले जात आहे
हुक्का पार्लर, क्लब च्या माध्यमातून दरदिवशी लाखो कोटी रुपयांची उलाढाल होत आहे. याच भागात नाईटच्या धंद्यामुळे गुन्हेगारी वाढत आहे वेळोवेळी नागरिकांनी तक्रारी देऊन देखील कारवाईचा दिखाऊपणा करत आहेत कोंढवा परिसरात गुन्हेगारी टोळ्या देखील सर्वाधिक असून मात्र स्थानिक पोलिसांच्या कारवाई शून्य नियोजना मुळे वारंवार होणारी कारवाई फोल ठरत आहे.यापूर्वी ठोस पावले उचलून रात्रभर चालणारे हॉटेल्स, हुक्का पार्लर बंद करण्यात अपयश येत असल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होतं आहे.
या हुक्का बार मध्ये लहान मुला – मुलीची जिंदगी उध्वस्त होत आहे. हे हुक्का पार्लरमध्ये कॉलेजचे मुली, मुले येतात. आणि त्यांचे वय 15-16 वर्ष असतात. पण हॉटेलवाले त्यांना खुले आम हुक्का घेण्याची परवानगी देतात. कोंढवा पोलिसांकडून कारवाई मात्र कागदावरच होताना दिसत आहे अशा कितीतरी हॉटेलवर कारवाई झाली तरी दोन दिवसांनी ते परत चालू करतात दोन दिवसा अगोदर एन.आय.बी.एम. कोंढवा हद्दीतील व्हिस्टा सोसायटी जवळ (EDP) फॅमिली रेस्टॉरंट क्लाउड 9 येथे सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला होता. तिकडे हॉटेल मालक, मॅनेजर, हुक्का बनवणारा, आणि वेटर असे एकूण चार जणांवर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच कोंढवा हद्दीत अनेक फॅमिली हॉटेल आणि रेस्टॉरंट बारच्या नावाखाली खुलेआम हुक्का पार्लर चालू आहे. यावरती सामाजिक सुरक्षा आणि वरिष्ठ अधिकारी लक्ष टाकणार का ? असा सवाल नागरिकांकडून होत आहे कारण की हे हुक्का पार्लरमुळे लहान मुले, व मुली यांच्यावर परिणाम होतात. आणि अनेक लोकांचे घर उध्वस्त होतात. कारण की ह्या हुक्कामध्ये नशेचे पदार्थ असतात. म्हणून त्यांना हुक्क्याची सवय लागते. आणि नागरिकाचे असे म्हणे आहे की, हॉटेलच्या नावाखाली चाललेले हुक्का पार्लर बंद झाले पाहिजे.
No comments:
Post a Comment