Crime News | मोबाईल चोर येरवडा पोलिसांच्या ताब्यात, चोरीचे पाच मोबाईल हस्तगत - PUNE MAJHA NEWS

Breaking

Post Top Ad

 


Wednesday, 17 May 2023

Crime News | मोबाईल चोर येरवडा पोलिसांच्या ताब्यात, चोरीचे पाच मोबाईल हस्तगत

पुणे माझा न्युज | प्रतिनिधी : अतिष लोंढे : येरवडा तसेच वडगावशेरी परिसरात दुचाकीवर येऊन जबरदस्तीने हिसका मारून मोबाईलची चोरी करणाऱ्या सराईत मोबाईल चोराला येरवडा पोलिसांनी शिताफिने अटक केली. हिदायत पटेल (वय 30, रा. केशवनगर मुंढवा, पुणे) या मोबाईल चोरास अटक करण्यात आली असून त्याच्याकडून मोबाईल चोरीच्या गुन्ह्यातील चोरीचे पाच मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. 


वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव शेरी येथे 29 जानेवारी रोजी दुचाकीवरून आलेल्या अनोळखी दोन इसमांनी रस्त्यावरून पायी चाललेल्या एका व्यक्तीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून चोरी केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. याप्रकरणी गुन्ह्याचा तपास करत असताना हा मोबाईल चोर कल्याणीनगर परिसरात येणार असल्याची माहिती तपास पथकातील अंमलदार तुषार खराडे,सुरज ओंबासे, किरण घुटे यांना मिळाली होती. त्यानुसार तात्काळ डीबी पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी सापळा रचून मोबाईल चोर हिदायत याला कल्याणी नगर येथे ताब्यात घेतले. त्याच्याकडून मोबाईल चोरीच्या इतर गुन्ह्यातील एकूण पाच मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे, सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, गुन्हे निरीक्षक जयदीप गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रमुख उपनिरीक्षक अंकुश डोंबाळे, सहाय्यक फौजदार प्रदीप सुर्वे, हवालदार गणपत थिकोळे, दत्ता शिंदे, तुषार खराडे, एकनाथ जोशी,पोलीस नाईक किरण घुटे, अमजद शेख,सागर जगदाळे, कैलास डुकरे, प्रवीण खाटमोडे,किरण अब्दागिरे, पोलीस अंमलदार अनिल शिंदे,राहुल परदेशी, सुरज ओंबासे,दत्तात्रय शिंदे, प्रशांत कांबळे, अश्विन देठे, सुशांत भोसले यांच्या पथकाने या सराईत मोबाईल चोराला जेरबंद केले

No comments:

Post a Comment

Post Top Ad