Big Breaking News | पुणे जिल्ह्यात खुनाचे सत्र सुरूच ; भर दिवसा गोळीबाराचा थरार, कोयत्यानेही केले वार - PUNE MAJHA NEWS

Breaking

Post Top Ad

 


Saturday, 13 May 2023

Big Breaking News | पुणे जिल्ह्यात खुनाचे सत्र सुरूच ; भर दिवसा गोळीबाराचा थरार, कोयत्यानेही केले वार

 पुणे जिल्ह्यात खुनाचे सत्र सुरूच ; भर दिवसा गोळीबाराचा थरार, कोयत्यानेही केले वार


पुणे माझा न्युज । प्रतिनिधी ; इम्रान पुनावाला :
तळेगाव नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर भरदुपारी अज्ञात हल्लेखोरांनी आवारे यांच्यावर गोळीबार व कोयत्याने वार करून जीवघेणा हल्ला केला. दरम्यान, त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. पण या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. शेकडो लोक जमल्याने रुग्णालय परिसरात तणाव निर्माण झाला आहे.    



पिंपरी: जनसेवा विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्यावर तळेगाव नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर प्राणघातक हल्ला झाला आहे. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झालाय. गोळीबार करुन त्यांच्यावर कोयत्याने वार करण्यात आले होते. हल्ल्या झाल्यानंतर त्यांच्यावर सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.हल्लेखोरांनी भर दुपारी गजबजाट असलेल्या परिसरात हल्ला केल्याने सगळ्यांची एकच धावपळ उडाली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, किशोर आवारे हे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांची भेट घेऊन खाली आले होते. त्यावेळी दबा धरून बसलेल्या चार जणांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यापैकी दोघाजणांनी गोळीबार केला. तर दोन जणांनी कोयत्याने वार केले. हल्ला केल्यानंतर हल्लेखोर त्याच ठिकाणी काही वेळ थांबून होते.

आवारे हे रक्‍ताच्या थारोळ्यात पडल्यानंतरही हल्लेखोर काहीवेळ तिथेच थांबून होते. जखमी अवस्थेतील आवारे यांना सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू होते, पण काहीच वेळात त्यांनी उपचारांना प्रतिसाद देणं बंद केलं. राजकीय वादातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून आवारेंचा या हल्यात मृत्यू झालाय.

राजकारणात जम बसवत होते, पण तिथेच माशी शिंकली...

No comments:

Post a Comment

Post Top Ad