बिल्डरला धमकावून टू बीएचके फ्लॅटसह ३० लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे माझा न्युज । प्रतिनिधी : कोंढवा, 11 एप्रिल 2023: बांधकाम सुरू ठेवण्यासाठी 30 लाख रुपये रोख आणि टू बीएचके अपार्टमेंटची मागणी करणाऱ्या तीन जणांविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिन्ही आरोपी हे सर्व पारगेनगर, कोंढवा खुर्द येथील रहिवासी असून त्यांची नावे समीर पठाण, शफी पठाण आणि साजिद अशी असून यांचे विरुद्ध मुस्तफा इमामसाहब शेख (वय 30, रा. लेन क्रमांक 9, शिवनेरीनगर, कोंढवा खुर्द) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना जानेवारी 2022 ते 9 एप्रिल 2023 दरम्यान घडली.
काही दिवसांपूर्वी हॉटेल चालकाने हॉटेल बाहेर मंडप टाकल्याने ३ लाखांची खंडणी मागितल्या प्रकरणी समीर शफी पठाण व त्याचा साथीदार अशा दोघांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यातच हा आता दुसरा गुन्हा त्याचेवर दाखल करण्यात आला असून फिर्यादीनुसार, इमामसाहब शेख हे कोंढवा खुर्द येथील पोकळे मळा येथे सातपैकी चार गुंठे जागेवर संयुक्त बांधकाम करत असताना आरोपींनी बांधकाम सुरू ठेवण्यासाठी 30 लाख रुपयांची मागणी केली.
तडजोड झाल्यानंतर आरोपी शफी पठाण यांनी शेख यांच्याकडे १५ लाख रुपये रोख आणि मशिदीच्या नावावर टू बीएचके अपार्टमेंट आणि समीर पठाण यांनी १० लाख रुपयांची मागणी केली.
शेख यांनी त्यांच्या मागणीला विरोध केला असता आपण कोणालाही घाबरत नाही, असे सांगून आरोपींनी बांधकाम थांबवून त्यांना धमकावले. याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास कोंढवा पोलीस करत आहेत.
No comments:
Post a Comment