पुणे माझा न्युज । प्रतिनिधी - कोंढव्यातील बांधकाम व्यावसायिकास चालु बांधकामावर विविध विभागांच्या कारवाईच्या धमक्या देवून तसेच इतर कारणांसाठी एकुण 51 लाख 50 हजार रूपये घेवून फसवणूक केल्या प्रकरणी तसेच साडे तीन लाख रूपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात घांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शफी पठाण आणि समीर पठाण (दोघे रा. पारगेनगर, कोंढवा खु. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी कोंढव्यात राहणार्या 35 वर्षीय बांधकाम व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सन 2017 पासुन आजपर्यंत फिर्यादीच्या बांधकाम साईटवर वेळावेळी जावून बांधकाम विभाग तसेच महसुल विभागातर्फे कारवाई करण्याची धमकी दिली. आरोपीने स्वतःचा वाढदिवस आणि महिला दिनी साडी वाटप कार्यक्रमासाठी तसेच जमीन खरेदीसाठी तर आरोपी समीर पठाणने पत्नीस पोटगी देण्यासाठी फिर्यादीकडून रोख रक्कम घेतली. फिर्यादीच्या विरूध्द केलेला तक्रारी अर्ज मागे घेतो तसेच मनपाच्या विविध परवानग्या काढून देतो असे सांगुन, पुन्हा शासकीय नियमानुसार बांधकाम करून नियमीत करणेसाठी 40 लाख रूपये मागुन फिर्यादीचे बांधकाम नियमीत न करता त्यांच्याकडून घेतलेली रक्कम स्वतःसाठी इनोव्हा गाडी घेण्यासाठी वापरली
आरोपींनी फिर्यादीकडून एकुण 51 लाख 50 हजार रूपये घेवून त्यांची फसवणूक केली तसेच आणखी 3 लाख 50 हजार रूपये मागितले. नाही दिले तर बांधकाम करू देणार नाही अशी धमकी दिली. फिर्यादीने पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी शफी पठाण आणि समीर पठाण यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक शिंदे करीत आहेत.
No comments:
Post a Comment