विश्रांतवाडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी: नवभारत तरुण मंडळाच्या वतीने महाराष्ट्रात प्रथमच Funktion One नावाची म्युजिक सिस्टीम
पुणे माझा न्युज : प्रतिनिधी - इम्रान पुनावाला । पुणे १४ एप्रिल २०२३ काल पुण्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या जयंतीत विश्रांतवाडी चौकात लाखोंचा जनसमुदाय सहभाग झाला होता. डी जे च्या तालावर विश्रांतवाडी चौकात हजारो लाखोंच्या संख्येने भीमसैनिक थिरकले
पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली. डीजेच्या तालावर रात्री उशिरा पर्यंत तरुणाईचा जल्लोष सुरू होता नव भारत तरुण मंडळाच्या वतीने या जयंतीनिमित्त महाराष्ट्रात प्रथम अशी Funktion One नावाची म्युजिक सिस्टीम लावण्यात आली दरम्यान विश्रांतवाडी चौकात भीमसागर मोठ्या संख्येने लोटला होता. विश्रांतवाडी चौकात भीम क्रांती मित्रमंडळ अमर मित्रमंडळ, न्यु भारत तरुण मंडळ ट्रस्ट, अखिल विश्रांतवाडी मित्रमंडळ, नव संगम मित्रमंडळ, अखिल चव्हाण चाळ मित्रमंडळ, तथागत प्रतिष्ठान, धम्म क्रांती मित्रमंडळ आदीसह विश्रांतवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील २५ मंडळानी डॉ. आंबेडकर जयंती साजरी केली. अनेक मंडळांतर्फे विविध उपक्रम राबवण्यात आले.
पोलिस उपायुक्त बोराटे यांनी शांततेत जयंती साजरी करण्याचे आवाहन मंडळाच्या कार्यकर्त्यांना केले. यावेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्र्य भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. सर्वच मंडळानी डीजे लावल्या मुळे मुख्य चौकात लाखो अनुयायी रात्री उशिरापर्यंत जयंतीचा आनंद घेत होते न्यु भारत तरुण मंडळ ट्रस्टचे सरचिटणीस राहुल जगताप यांनी जयंतीत आलेल्या सर्व भीमसैनिकांचे तसेच पोलीस प्रशासनाचे आभार मानले त्याच बरोबर आलेले सर्व मंडळाचे व आपल्या सहकाऱ्यांचे आभार मंडळाचे अध्यक्ष स्वप्नील गंगावणे यांनी मानले तसेच इतर कार्यकर्ते यांनी महिला व लहान मुले मुली यांचे खास लक्ष देऊन त्याचे सुरक्षते बाबतीत आवश्यक त्या सूचना दिल्या
No comments:
Post a Comment