The Initiative of Panpoi Implemented by Humanity Foundation | ह्युमॅनिटी फाऊंडेशनने राबविलेल्या पाणपोईचा उपक्रम कौतुकास्पद‎ - PUNE MAJHA NEWS

Breaking

Post Top Ad

 


Thursday, 16 March 2023

The Initiative of Panpoi Implemented by Humanity Foundation | ह्युमॅनिटी फाऊंडेशनने राबविलेल्या पाणपोईचा उपक्रम कौतुकास्पद‎

 ह्युमॅनिटी फाऊंडेशनने राबविलेल्या पाणपोईचा उपक्रम कौतुकास्पद‎


पुणे माझा न्युज । प्रतिनिधी :
पाणपोईसारखा उपक्रम हा‎ तहानलेल्या जिवांची तृष्णा‎ भागविणारा असून, कोंढवा या ठिकाणी महावितरण कार्यालय व पोलिस स्टेशनला येणाऱ्या नागरिकांची गरज ओळखून‎ हजारो लोक‎ येथे विविध कामांसाठी येत असतात त्यांच्या पिण्याच्या पाण्याची‎ व्यवस्था व्हावी म्हणून येथील महावितरण कार्यालय व‎ पोलिस चौकी प्रांगणात ह्युमॅनिटी फाऊंडेशन ने सुरू केलेल्या पाणपोईचे‎ उद्घाटन कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनावणे यांच्या हस्ते‎ बुधवारी करण्यात आले. 
 

या वेळी‎ झालेल्या पाणपोईच्या उद्घाटनप्रसंगी ह्युमॅनिटी फाऊंडेशनने राबविलेला‎ पाणपोईसारखा उपक्रम खरच कौतुकास्पद‎ असल्याचे कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनावणे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले

कोंढवा परिसरात ह्युमॅनिटी फाऊंडेशनच्या सर्व पदाधिकारी यांच्या वतीने‎ वेगवेगळ्या ठिकाणी सात पाणपोई बसविण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले संस्थेचे अध्यक्ष कुमैल रजा यांनी आलेल्या अतिथीचे‎ स्वागत केले  

यावेळी संघटनेचे सेक्रेटरी मुर्तुजा शेख, आरिफ खान, मोहम्मद रझा, अरबाज शेख, डॉ युसूफ तडवी, यासिर शेख, कुतुबुद्दीन शेख, नदीम मुजावर केंद्रीय पत्रकार संघाचे पुणे शहर अध्यक्ष रियाज मुल्ला आदी उपस्थित होते.‎

No comments:

Post a Comment

Post Top Ad