Pune Police Ramadan Guidelines | पवित्र रमजान महिना तसेच रमजान ईद निम्मित पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शक सूचना - PUNE MAJHA NEWS

Breaking

Post Top Ad

 


Thursday, 23 March 2023

Pune Police Ramadan Guidelines | पवित्र रमजान महिना तसेच रमजान ईद निम्मित पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शक सूचना

पवित्र रमजान महिना तसेच रमजान ईद निम्मित पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शक सूचना


पुणे माझा न्युज : प्रतिनिधी :-
रमजान महिना हा मुस्लिम समाजाचा पवित्र महिना मानला जातो यामध्ये ठीक ठिकाणी नमाज साठी येणाऱ्या असंख्य लोकांना अडचणी तसेच बाजारपेठा सज्ज करताना काही महत्वाच्या सूचना पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक यांनी जारी केल्या आहेत पुणे शहरात कोंढवा परिसरात बहुसंख्य मुस्लिम राहत असून कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील मुस्लिम बांधवांची रमजान ईद सणा निमित्त मस्जिदचे मौलाना ट्रस्टी विश्वस्त व शांतता कमीटी सदस्य यांची मिटिंग सिटी लॉन्स, पारगे नगर, कोंढवा पुणे येथे पार पडली सदर मिटिंग मध्ये संदीप कर्णिक पोलीस सह आयुक्त पुणे शहर,मा. रंजन शर्मा अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग पुणे, श्री विक्रांत देशमुख पोलीस उप आयुक्त सो परिमंडळ 5 व पौर्णिमा तावरे मॅडम सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे शहर, माजी आमदार महादेव बाबर, माजी आमदार योगेश टिळेकर, माजी नगरसेवक गफूर पठाण, माजी नगरसेविका नंदा लोणकर, जाहीर शेख अध्यक्ष ॲक्शन कमिटी पुणे शहर, समीर पठाण अल्पसंख्यांक अध्यक्ष पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, कारी ईदरीस अन्सारी जमाते इस्लामी हिंद, मौलाना निजामुद्दीन, मुफ्ती हाश्मी, सुफी अन्वर शेख, छबिल पटेल, मौलाना जावेद व इतर  मस्जिद मधील सर्व मौलाना व ट्रस्टी यांना  खालील प्रमाणे सूचना देण्यात आल्या.
 
 
रमजान निमित्त महत्वाच्या सूचना 
 
 १) मस्जिदचे आजु-बाजुस/वाहनांची पार्किंग होवु देऊ नये, मस्जिदमध्ये येणारे अनोळखी व्यक्ती, संशयित व्यक्ती यांचे हालचालीवर लक्ष ठेवण्याकरिता म्हणुन नमाज सुरू होणेपुर्वी मशिदीचे आतील बाजुची पाहणी करण्याकरिता स्वंयसेवक नेमावेत.

२) मस्जिद, मदरसा, अंजुमन, दर्गा याठिकाणी रमजान सणा निमित्त बाहेरगावाहून चंदा गोळा करण्यासाठी लोक येतात त्यांचे कागदपत्रे, ओळखपत्रे, तसेच त्यांचे पावत्या अधिकृत आहेत का? याची खात्री मस्जिद चे ट्रस्टी/विश्वस्त यांनी करावी.

३) भिक्षेकरी लोकांना मस्जिद जवळ थांबु देवु नये.

४) मशिद चे आजूबाजूचा परिसरात राडा रोडा, केर कचरा असल्यास परिसर स्वच्छ ठेवावा.

५)  ईद चे दिवशी नमाजला येताना शक्यतो वाहने मशिदचे आवारात आणू नयेत, तसेच वाहने मस्जिदच्या बाहेर २०० मीटरचे परीसरात इतर वाहतूकीस अडथळा होणार नाही अश्या ठिकाणी पार्क करावीत, अश्या सूचना सर्व मूस्लिम बांधवांना कराव्यात.

६) मस्जिद मध्ये नमाज करीता प्रवेश करताना व बाहेर जाताना गडबड गोंधळ, चेंगरा चेंगरी होऊ नये याकरीता दक्षता घ्यावी. मस्जिद मध्ये आत प्रवेश करणे करीता एकच प्रवेश द्वार असावे.

७) पोलीस स्टेशन, पोलीस चौकी, अॅम्ब्युलन्स, अग्निशामक दल, म.न.पा. पुणे यांचे कंट्रोल रूम चे संपर्क नंबर मस्जिदचे दर्शनीय भागावर बोर्ड लावावेत.

८) मस्जिद मध्ये विद्युत पुरवठा करणा-या तारा, दिवे, पंखे अन्य विद्युत उपकरणे सुरक्षित आहेत याची खात्री करावी. व पुरेसा प्रकाश राहील अशा लाईटची पर्यायी व्यवस्था ठेवावी.

९)
मस्जिद मध्ये ज्वलनशिल (उदा. रॉकेल, पेट्रोल, गॅस) असे पदार्थ ठेऊ नयेत. अपघाताने आग लागल्यास तत्काळ आग विझविण्या करीता अग्निशमक उपकरणे,वाळूच्या व पाण्याने भरलेल्या बादल्या सहज उपलब्ध होतील अशा ठिकाणी ठेवाव्यात.

१०) मस्जिद मध्ये व मस्जिद समोर समाज कंटक, गुन्हेगार, यांचे संशायदस्पद हालचाली, संशयास्पद बेवारस वस्तू, बॅग यांचे बाबत काही माहीती मिळाल्यास तत्काळ पोलीसांना कळवावे.

११)
मस्जिद चे आतील आवारात व बाहेरील जाण्या-येण्याचे मार्गावर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सी.सी.टि.व्ही कॅमेरा बसवावेत, कॅमेरे बसविले असल्यास व्यवस्थित काम करत आहेत का? त्यांचे रेकॉडींग होत आहे का? याची खात्री करावी. कमित कमी एक महिन्याचा बॅकअप ठेवावा.
 
१२) अफवांवर विश्वास ठेऊ नये, कोणाकडूनही कोणत्याही प्रकारची अफवा पसरली जाणार नाही याबाबत सूचना द्याव्यात, असे कोण करत असल्यास त्यास प्रतिबंध करून पोलीसांना तत्काळ त्याबाबत कळवावे.

१३)
खाद्य पदार्थ विक्री करीता लावणारे स्टॉल धारक यांनी स्टॉल रस्ता सोडून वाहतूकीस अडथळा होणार नाही अशा पद्धतीने लावण्यात यावे. स्टॉल लावणेकरीता आवश्यक ती संबधीत पो.स्टे., वाहतूक शाखा व क्षेत्रिय कार्यालयाची परवानगी घेणे आवश्यक आहे.

१४)
खाद्य पदार्थ स्टॉल धारकानी अधिकृत गॅस सिलेंडरचा वापर करावा. सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी घ्यावी. अग्निशामक उपकरण जवळ बाळगावे.

१५)
शिळे व उरलेले अन्न पुन्हा विक्री करीता ठेऊ नये, अन्नामधून विषबाधा होणेची शक्यता नाकरता येत नाही.
 या सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करण्यास सांगितले तसेच  पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही व आगामी येणारे सर्व हिंदू मुस्लीम सण-उत्सव हे शांततेत साजरे होतील
याबाबत  योग्य ते मार्गदर्शन करून सूचना देण्यात आलेल्या असून मीटिंग साठी जनसमुदाय 150 ते 200 उपस्थित होता. तसेच कोंढवा पोलीस स्टेशन कडील पोलिस स्टाफ,गोपनीय कर्मचारी हे उपस्थित होते.सदर कार्यक्रम 11.00 वा सुरू होऊन 13.00 वा शांततेत पार पडला
 
 

No comments:

Post a Comment

Post Top Ad