पुणे पोलीस निरिक्षकांच्या अंतर्गत बदल्या ! पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी काढले आदेश: फरासखाना व कोंढवा
पुणे माझा न्युज : प्रतिनिधी पुणे शहर, - पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील आस्थापना मंडळाच्या बैठकीत पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यावेळी फरासखाना वरिष्ठ निरीक्षक, कोंढवा गुन्हे निरीक्षक व गुन्हे शाखा युनिट-1 येथील बदल्या करण्यात करण्यात आल्या आहेत. सदर आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी काढले आहेत.
वाहतूक शाखेतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा यांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक फरासखाना पोलीस ठाणे म्हणून निर्देशित करण्यात आले आहे. गेल्या दोन महिन्यापूर्वीच फरासखाना वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून रुजू झालेले शब्बीर सय्यद यांची गुन्हे शाखेच्या युनिट-1 पदी बदली करण्यात आली आहे. तर गुन्हे शाखा युनिट-1 पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांची यापूर्वीची गुन्हे निरीक्षक भारती विद्यापीठ येथील बदली अंशतः बदलून त्यांना कोंढवा गुन्हे निरीक्षक म्हणून पदस्थापना देण्यात आली आहे.
दि. 11 मार्च रोजी झालेल्या आस्थापना मंडाळाच्या बैठकीत अंतर्गत प्रशासकीय कारणास्तव बदल्या करण्यात आल्या आहेत.
दि. 11 मार्च रोजी झालेल्या आस्थापना मंडाळाच्या बैठकीत अंतर्गत प्रशासकीय कारणास्तव बदल्या करण्यात आल्या आहेत.
No comments:
Post a Comment