पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे निधन...
माजी मंत्री आणि सध्याचे पुण्याचे भाजपचे खासदार गिरीश बापट यांचे आज दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.
पुणे माझा न्युज : प्रतिनिधी - माजी मंत्री आणि सध्याचे पुण्याचे भाजपचे खासदार गिरीश बापट (वय ७२) यांचे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारादरम्यान आज (बुधवार) निधन झाले. गिरीश बापट यांच्या पार्थिवावर सायंकाळी सात वाजता वैकुठं स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
गिरीश बापट हे अनेक दिवसांपासून आजारी आहेत. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. सध्या आय.सी.यु मध्ये उपचार सुरु असताना प्रकृती चिंताजनक होत गेली होती. उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले आहे.
गिरीश बापट यांनी जवळपास ३० वर्षे कसबा मतदारसंघाचे नेतृत्व केले. तर सध्याचे पुणे शहराचे ते विद्यमान खासदार होते. सर्वपक्षीय नेत्यांशी सलोख्याचे संबंध असणारा नेता अशी गिरीश बापट यांची ओळख होती.
दरम्यान, बापट यांनी काही दिवसांपूर्वी झालेल्या कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या कार्यकर्त्यांचा एक मेळावा घेतला होता. काही दिवसांपूर्वी गुढीपाडव्या निमित्त कसबा गणपतीसमोर गिरीश बापटांच्या खासदार निधीतून करण्यात आलेल्या विकास कामांचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमाला गिरीश बापट यांच्याकडून कॉंग्रेसचे विद्यमान आमदार रविंद्र धंगेकर आणि त्यांचे भाजपमधील प्रतिद्वंद्वी हेमंत रासने यांना आमंत्रित करण्यात आले होते. हा सर्वसमावेशकपणा हेच गिरीश बापट यांच्या राजकारणाचे वैशिष्ट्य होते. गेल्या चाळीस वर्षांहून अधिक काळ बापट हे राजकारणात सक्रीय आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ते आजारी आहेत. त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आज अचानक त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती डॉक्टरांनी दिली असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
No comments:
Post a Comment