Kondhwa Police Arrested the Accused Who Attempted Murder in Just Four Hours | खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस कोंढवा पोलीसांनी केले अवघ्या चार तासात अटक - PUNE MAJHA NEWS

Breaking

Post Top Ad

 


Wednesday, 29 March 2023

Kondhwa Police Arrested the Accused Who Attempted Murder in Just Four Hours | खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस कोंढवा पोलीसांनी केले अवघ्या चार तासात अटक

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस कोंढवा पोलीसांनी केले अवघ्या चार तासात अटक

पुणे माझा न्युज । प्रतिनिधी : दारू पिण्याच्या कारणावरून मित्रांमध्ये झालेल्या वादातून धारदार हत्याराने वार करून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी पैकी एका आरोपीस कोंढवा पोलिसांनी चार तासांत अटक केली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

साईनगर गल्ली नं २ येथे सोमवारी (ता. २७) रात्री दहाच्या सुमारास रोहित अशोक खंडाळे (वय २४ वर्षे, रा. स.नं. ५९, गल्ली नं ०४, शिवछत्रपती शाळे जवळ, कोंढवा बु., पुणे) हे त्यांचा मित्र वैभव साळवे यांच्या सह दारू पिण्यास बसले होते. त्यांच्या शेजारी परिसरात राहणारा आरोपी मंगेश माने, सागर जाधव, पवन राठोड, सुरज पाटील व अभिजीत उर्फ जब्या सुरेश दुधनीकर हे सुद्धा दारू पिण्यास बसले होते. दारू पित असताना झालेल्या वादातून आरोपी यांनी त्यांच्याकडील धारदार हत्याराने फिर्यादी यांच्यावर सपासप वार करून गंभीर जखमी केले आणि सदर ठिकाणावरून पळून गेले. सदरबाबत कोंढवा पोलिस ठाणे येथे गु.र.नं. ३२७/२०२३ भादंवि कलम ३०७,३२६,३२३,५०४, १४३, १४७, १४८, १४९, व महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७(२).(३) सह २३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

कोंढवा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलिस निरीक्षक गुन्हे संजय मोगले यांनी सदर गुन्ह्याचे अनुषंगाने तपास पथकातील अधिकारी व अंमलेदार यांना योग्यत्या सुचना देवून आरोपी यांना तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले. त्या अनुषंगाने कोंढवा तपास पथकाचे सहा. पोलिस निरीक्षक अनिल सूरवसे व तपास पथकातील पोहवा/२८३ अमोल हिरवे, पोहवा/३७६८ महेश वाघमारे, पोशि/८४४२ गणेश चिंचकर, पोशि/९१२६ विकास मरगळे, व पोशि/१००२६ राहूल थोरात यांनी सदर गुन्ह्यातील आरोपींबाबत माहिती काढून आरोपी पवन रविंद्र राठोड (वय २६ वर्षे, रा. तुकाराम वडतरे यांच्या खोलीमध्ये भाड्याने, साईनगर गल्ली नं. ०२ कोंढवा बु., पुणे) यास चार तासांचे आतमध्ये ताब्यात घेवून उत्कृष्ठ कामगिरी केली आहे. तसेच इतर आरोपींचा शोध घेण्यात येत असून त्यांना अटक करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

Post Top Ad