पुण्यात १३ पोलीस निरीक्षकांसह ३ सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या; आयुक्त रितेश कुमार यांच्या आदेशानुसार
पुणे माझा न्युज । प्रतिनिधी : पुणे शहारत पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी पोलीस दलात मोठे फेरबदल केले आहेत. शहरातील तेरा पोलीस निरीक्षक आणि तीन सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी पुणे शहर आयुक्तांचा पदभार सांभाळल्यानंतर पोलीस दलात फेरबदल केले जाणार असल्याचे सांगितले जात होते. आज प्रत्यक्ष त्याबाबतचे आदेश काढण्यात आले.
पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांची बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी नेमणूक करण्यात आली आहे. तर भाऊसाहेब पठारे यांची वरिष्ठ पोलीस निरीक्षक वानवडी, तसेच चंद्रशेखर विठ्ठल सावंत यांची पोलीस आयुक्त यांचे वाचक, तर भरत जाधव यांची विशेष शाखेमधून गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागामध्ये बदली करण्यात आली आहे. त्याचबरोबर सामाजिक सुरक्षा विभागाचे विजय कुंभार यांची भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी, संतोष सोनवणे यांची विमानतळ वाहतूक शाखेतून कोंढवा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी, मनोहर बिडकर यांची विशेष शाखेतून वाहतूक शाखेमध्ये, ब्रह्मानंद नाईकवाडी यांची चतुशृंगी पोलीस ठाणे, संदीप भोसले यांची गुन्हे शाखा युनिट एक वरून भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक (गुन्हे) पदी बदली करण्यात आली आहे. सुनील जाधव यांची गुन्हे शाखेमधून वाहतूक शाखेत तर प्रताप मानकर यांची बंडगार्डन पोलीस ठाण्यावरून खंडणी विरोधी पथक युनिट दोनमध्ये बदली करण्यात आली आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक श्रीहरी बहिरट यांची गुन्हे शाखेच्या युनिट तीन आणि बालाजी पांढरे यांची चतु:शृंगी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक पदावरून गुन्हे शाखा युनिट एकच्या निरीक्षक पदी बदली करण्यात आली आहे.
यासोबतच सिंहगड रोड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त विष्णू पवार यांची गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस आयुक्त पदी बदली करण्यात आली आहे. गजानन टोम्पे यांची गुन्हे शाखेतून विश्रामबाग विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. तर राजेंद्र गलांडे यांची प्रशासन विभागातून सिंहगड रोड विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment