Dunzo या ऑनलाईन डिलिव्हरी कंपनीमध्ये नोकरीचे आमिष दाखवत २६ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार
पुणे माझा न्युज । प्रतिनिधी : कोंढवा परिसरात ही धक्कादायक घटना समोर आली असून, बलात्कार करून फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पीडित महिलेकडून १ लाखांची खंडणी मागण्याचा प्रकार या नराधमांनी केला आहे. या घटनेमुळे पुण्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पुणे एन जी ओ फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा पत्रकार याच्या हस्तक्षेपाने या पिडीत महिलेला कोंढवा पोलिसांकडून न्याय देण्यात आला आहे
या प्रकरणी २६ वर्षीय पीडित महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार आरिफ खान, रवी आणि रियाज अशा ३ जणांविरोधात पोलिसांनी बलात्कार, खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरिफ खाननने पीडितेला आपण तिच्या पतीचा मित्र असल्याचे सांगून तसेच Dunzo या ऑनलाईन डिलिव्हरी कंपनीमध्ये नोकरी लावून देतो असे सांगितले. डिलिव्हरी गर्ल म्हणून काम लावून देतो असे सांगत आरोपी आरिफने पीडितेला एक डिलिव्हरी करण्याच्या बहाण्याने बोलावून घेतले. त्यानंतर पीडितेला एका लॉजवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला.
याबाबत कोणाला काही सांगितले तर दुसरा आरोपी रवीने फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडे १ लाखांची खंडणी मागितली. तर, तिसऱ्या आरोपीने पीडितेला सातत्याने धमकावल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. हा सर्व धक्कादायक प्रकार जुलै २०२२ ते ऑगस्ट २०२२ दरम्यान घडला असून, आरोपींच्या जाचाला कंटाळून पीडितेने पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार कोंढवा पोलिस ठाण्यात वरील तीन आरोपींविरोधात भारतीय दंडात्मक कलम ३७६ (२), ५०६, ३८४, ३२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तिन्ही आरोपी अद्याप फरार असून पुढील तपास कोंढवा पोलीस करत आहेत.

No comments:
Post a Comment