कोंढवा पोलीस “हतबल” असल्याची सर्वत्र का होत आहे चर्चा ? मटका जुगार, गांजा जोरात तर नागरिक कोमात
पुणे माझा न्युज । प्रतिनिधी - अवैध मटका व जुगार व्यवसाय समूळ नष्ट करण्यासाठी पोलिस प्रशासन सातत्याने प्रयत्न करीत असते. मात्र स्थानिक पोलिसांच्या कारवाई शून्य नियोजना मुळे वारंवार होणारी कारवाई फोल ठरत आहे.यापूर्वी ठोस पावले उचलून मटका-जुगार मालकांच्या मुसक्या आवळणाऱ्या पोलिस प्रशासनाला कोंढवा परिसरात मटका जुगार, बंद करण्यात अपयश येत असल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होतं आहे.
कोंढवा पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात बेकायदा मटका, जुगार व्यावसायिकांचे प्रमाण फोफावत असल्याने अवैध व्यवसायामुळे कायदा व सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होत आहे. विशेषतः मटका माफिया कोंढव्यात एक नसून गल्ली बोळात स्वतंत्रपणे मटका, जुगार चालवत आहेत. त्यापैकी तालाब, सोमजी जवळ ऑनलाईन लॉटरी, काकडे वस्ती, भीम नगर, कमेला, सत्यानंद हॉस्पिटल जवळ, HM रॉयल, याठिकाणी असल्याचे लोकचर्चेतून समजत आहे.
कोंढवा पोलीस स्टेशन मधील पोलीसांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन वेळा कारवाई केल्याने, पोलीस आयुक्तांनी, कोंढवा पोलीस स्टेशनचा सर्व कारभार स्वतःकडे वर्गीकृत केला होता. त्याच बरोबर कोंढवा पोलीस स्टेशनवर थेटच पोलीस आयुक्तांचे बारीक लक्ष होते परंतु आयुक्तांची बदली झाल्याने कोंढवा पोलिसांनी मोकळा श्वास घेतला आहे त्याचा परिणाम वाढती गुन्हेगारी, नाईट क्लब, नाईट हॉटेल्स याला ऊत आला आहे कोंढव्यामध्ये सर्वाधिक हुक्का पार्लर, गांजा आणि अंमली पदार्थांची मोठी बाजारपेठ उभी राहिली आहे. त्याच बरोबर गुटख्याचे सर्वाधिक मोठे होलसेल बाजार याच भागात आहेत. थोडक्यात गुन्हेगारी टोळ्यांकडून थेटच मटका, जुगार अड्डे, ऑनलाईन लॉटरी, गांजा व गुटख्यासहित अंमली पदार्थांची विक्री केली जात आहे. हुक्का पार्लर, क्लब च्या माध्यमातून दरदिवशी लाखो कोटी रुपयांची उलाढाल होत आहे. याच भागात नाईटच्या धंद्यामुळे गुन्हेगारी वाढत आहे वेळोवेळी नागरिकांनी तक्रारी देऊन देखील कारवाईचा दिखाऊपणा करत आहेत कोंढवा परिसरात गुन्हेगारी टोळ्या देखील सर्वाधिक आहेत.
याच परिसरात गांजा मोठ्या प्रमाणात विक्री केला जात असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे तसेच रात्रभर चालणारे हॉटेल्स मुळे अनेक लोक या हॉटेल चालक व पोलिसांना वैतागले आहेत अनेक तक्रारी करून देखील एकजण कारवाई करतो तर दुसरा हॉटेल्स चालू ठेवण्यासाठी दादागिरी करतो असाच प्रकार कोंढवा पोलिसांकडून केला जात आहे
सट्टा, मटका माफीयांकडे कमी वेळात झटपट श्रीमंत होण्याच्या नादात रुपयावर अंशी रुपये मिळत असल्याने बेरोजगार तसेच लालची प्रवृत्तीचे लोक या मटक्याच्या मागे लागलेले असून आज पर्यंत हे मटका किंग लाखो करोडो ने श्रीमंत होत आहेत मात्र मटक्यावर पैसा लावणारे गरीब व बेरोजगार आणखीनच गरिबीच्या दरीत ओढले जात आहेत.
सर्व मटका व गांजा माफियांचा व्यवसाय सुरळीत चालावा म्हणून स्थानिक यंत्रणेला “अर्थपूर्ण” पद्धतीने सोबत घेऊन चालत असल्यानेच कोंढवा परीसरात हा मटका-जुगार, गांजा व्यवसाय तेजीने व बेधडक सुरु असल्याचे लोकांमध्ये खुलेआम चर्चिले जात आहे.तर पोलीस प्रशासनाकडून यावर अंकुश लावण्यात येऊन मोहात गुंतलेल्या सामान्य नागरिकांना सट्टा,मटका, जुगार, गांजा यातून दिलासा मिळावा अशी सुज्ञ नागरिक अपेक्षा बाळगून आहेत
वसुली बहाद्दर करताहेत दरमहा लाखोंची वसुली .......
सट्टा,मटका,जुगार गांजा व्यावसायिकांना स्थानिक पोलिस, गुन्हा अन्वेषण विभाग किंवा इतर विशेष पथकाचा छापा पडणार नाही याची खात्री असल्याने या परिसरात संगनमताने अवैध व्यवसायांचा जम बसवण्यात आला आहे. दरमहा लाखो-करोडो रुपयांची उलाढाल होणाऱ्या या व्यवसायाने पोलिसांना हाताशी घेऊन व्यावसायिकांनी देवाण घेवाण वाढवून आपली छाप बनवली आहे या व्यावसायिकांना प्रशासनाची कोणतीच भीती राहिली नसून पोलिसांशी लांघेबाधे करून व्यवसाय जोरात सुरु केला आहे
लवकरच फोटो आणि व्हिडिओ सहित बातमी प्रकाशित होणार
No comments:
Post a Comment