Pune Crime News | माथाडीच्या नावाखाली बेकायदेशीर खंडणी मागणा-या दोन इसमांना अटक । खंडणी विरोधी पथक दोनची कारवाई - PUNE MAJHA NEWS

Breaking

Post Top Ad

 


Monday, 30 January 2023

Pune Crime News | माथाडीच्या नावाखाली बेकायदेशीर खंडणी मागणा-या दोन इसमांना अटक । खंडणी विरोधी पथक दोनची कारवाई

पुणे माझा न्युज । प्रतिनिधी : पुण्यात माथाडीच्या नावावर अनेक जण दम दाटी करून पैसे उकळण्याचे प्रकार सुरु झाले आहेत असाच काही प्रकार विमान नगर येथे घडला  फिर्यादी यांचेकडे अरोमॉल विमाननगर येथील साहित्याचे लोडींग अनलोडींगचे काम असताना दि. १२/०८/२०२२ रोजी ते दिनांक २५/०१/२०२३ रोजीच्या दरम्यान आरोपी नामे १) संकेत दिलीप गवळी, वय २९ वर्षे, रा. सुखवाणी रॉयल, बी बिल्डींग फॅलट नं. २०१, एस-२, विमाननगर, पुणे, २) अरुण शंकर बोदडे, वय ४८ वर्षे, रा. भैरव नगर, अय्यप्पा मंदिर जवळ, धानोरी रोड, पुणे, ३) नितीन एकनाथ कांबळे रा. लोहगाव पुणे यांनी आपआपसात संगणमत करून फिर्यादी यांना वरील नमूद ठिकाणी लोडींग अनलोडीग करू न देता गाडयांची आडवणुक करुन कोणतीही वर्क ऑर्डर नसताना नोंदणीकृत माथाडी कामगार नसताना कोणतेही काम न करता फिर्यादी याना जिवे ठार मारण्याची धमकी देवुन, फिर्यादी यांचेकडे १,२६,०००/- रु. ची मागणी केल्याने फिर्यादी यांनी सदरबाबत तक्रारी अर्ज दि. २४/०१/२०२३ रोजी दिला होता...


मा. पोलीस निरीक्षक प्रताप मानकर खंडणी विरोधी पथक २ गुन्हे शाखा, पुणे यांनी सदर तक्रारीची तत्काळ दखल घेवून वेगवेगळी दोन पथक तयार केली व सापळा कारवाई करुन आरोपीतांना तडजोडीअंती फिर्यादी यांचेकडून २६ हजार रुपयांची खंडणीची रक्कम घेताना रंगेहात पकडून त्यांचे विरुध्द विमानतळ पोलीस स्टेशन गु. रजि.नं. ४७ २०२३ भा.दं.वि. कलम ३८६.३८७,३४१, ३४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. नमूद गुन्हयातील आरोपी क्र. १ व २ हे पोलीस कस्टडीमध्ये आहेत. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक मोहनदास जाधव, खंडणी विरोधी पथक- २ गुन्हे शाखा, पुणे शहर हे करीत आहेत.


सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त, श्री. रितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त, श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. अमोल शेंडे, सहा पोलीस आयुक्त, गुन्हे २ श्री नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शानाखाली खंडणी विरोधी पथक २ गुन्हे शाखा, पोलीस निरीक्षक श्री प्रताप मानकर, सहा. पो. निरीक्षक चांगदेव सजगणे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, मोहनदास जाधव व पोलीस अंमलदार विजय गुरव, प्रदिप शितोळे, शैलेश सुर्वे, विनोद साळुंके, संग्राम शिनगारे, सैदोबा भोजराव, सचिन अहिवळे, अमोल पिलाने, चेतन आपटे, अनिल मेंगडे, पवन भोसले, आशा कोळेकर यांनी केलेली आहे.

पुणे शहरातील व्यावसायिकांना अनाधिकृत माथाडी व खंडणी संदर्भात बेकायदेशीर पैशाची मागणी, आडवणूक होत असल्यास त्या संदर्भात संपर्क करण्याचे आवाहन पुणे शहर पोलीस दलामार्फत करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

Post Top Ad