अनधिकृत बांधकाम व अतिक्रमणावर कारवाईसाठी पाठपुरावा करणाऱ्या पत्रकाराला धमकी देण्याचे प्रकार सुरु
पुणे माझा न्युज । प्रतिनिधी पुणे : सोसायटीच्या पार्किंगमध्ये हॉटेल चालकांनी अनधिकृतपणे ताबा घेऊन हॉटेल चालवत असल्याने त्याची माहिती घेऊन त्याचा महानगरपालिके बरोबर पत्रव्यवहार तसेच त्याचा पाठपुरावा करणाऱ्या पत्रकाराला धमकी देण्याचे प्रकार सुरु झाले आहेत
सावरकर भवन येथील झोन क्रमांक ७ च्या हद्दीत अनेक ठिकाणी अतिक्रमण करून अनधिकृत बांधकाम केल्याने याची तक्रार दाखल करण्यात आली होती त्या सोसायटीचे आजून कम्प्लिशन झाले नसून त्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याने पत्रकाराने पालिकेच्या अधिकाऱ्यांना निर्देशनास आणून दिले परंतु काही भ्रष्ट अधिकारी यांनी चक्क हॉटेल चालकाचा बचाव करण्यासाठी मुदत वाढ करून देऊन पाठीशी घालण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत
पालिकेच्या नियमानुसार तक्रारी अर्जावर १५ दिवसात कारवाई करण्यात येते परंतु अधिकाऱ्यांकडून कारवाईच्या नावावर फक्त कागदी घोडे नाचवत असल्याचे समोर आले आहे
याबाबत केंद्रीय पत्रकार संघाचे अध्यक्ष रियाज मुल्ला यांनी या प्रकरणात २५ नोव्हेंबर २०२२ रोजी तक्रार दाखल केली होती जवळजवळ दीड महिना होऊन ही आज पर्यंत कारवाई झाली नाही त्याच परिसरात शेजारील अनधिकृत/अतिक्रमण बांधकामावर कारवाई करण्यात आली परंतु या बांधकामावर आजून कागदी घोडेच धावत आहेत कारवाई का होत नाही याचे कारण भ्रष्ट अधिकारी वर्ग याच्यात सामील आहेत अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहेत
या प्रकरणात रियाज मुल्ला यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने त्यांना अनोळखी व्यक्तीच्या नावाने धमकी देत आहेत तरी देखील कारवाई का होत नाहीये हा सर्वात मोठा सवाल आहे नक्की या प्रकरणात कोण कोण सामील आहेत याचा लवकरच शोध घेऊन जनतेसमोर आणू जर भविष्यात माझ्यावर हल्ला झाला तर याला सर्वस्वी जवाबदार हे पालिका अधिकारी व हॉटेल चालक असतील असे रियाज मुल्ला यांनी यावेळी बोलताना सांगितले
No comments:
Post a Comment