अंमली पदार्थ विरोधी पथक २ गुन्हे शाखा पुणे शहरची धडाकेबाज कारवाई : आरोपींकडून १० किलो ३१० ग्रॅम गांजा जप्त
पुणे माझा न्युज : प्रतिनिधी पुणे : अंमली पदार्थ विरोधी पथक-२ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार हे परिमंडळ-४ मधील येरवडा पोलीस ठाणेच्या परिसरात दिनांक २३/११/२०२२ रोजी पेट्रोलींग करीत असताना, पोलीस अंमलदार यांना बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, दोन इसम ख्रिश्चन स्मशान भुमी समोर अंमली पदार्थ विक्री करीता येणार आहेत असल्याची माहिती बातमीदार मार्फत मिळाल्याने अंमली पदार्थ विरोधी पथक-२, कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी १ ) अजय मुक्तीलाल पवार, वय-२८ वर्ष, रा. मु.पो. खुटवाडी, पोस्ट वरला, जिल्हा बडवानी, राज्य मध्य प्रदेश २ ) अरविन सुखलाल सोलंकी, वय २८ वर्षे, रा. मु.पो. मोहदा, ता. पासेमल, जिल्हा बडवानी, राज्य मध्य प्रदेश हे दोघे त्यांचे पाठीवरील काळया रंगाचे सॅकबॅगमध्ये २,०६,२००/- रु किचा १० किलो ३१० ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ, किं.रु. १,०००/- रु च्या दोन काळ्या रंगाची रॉकबॅग व २०,०००/- रू किचे दोन मोबाईल संच असा एकुण २,२७,२००/- रु किचे अंमली पदार्थ व इतर ऐवजासह संगनमताने अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या विक्री करीता जवळ बाळगताना मिळुन आल्याने, त्यांचेविरुध्द येरवडा पोलीस ठाणे गु.र.नं. ५४३ / २०२२. एन. डी. पी. एस. अॅक्ट कलम ८ (क). २० (ब) (ii) (ब), २९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दाखल गुन्हयाचा पुढील तपास येरवडा पोलीस ठाणे हे करीत आहेत.
सदरची उल्लेखनीय कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त श्री अमिताभ गुप्ता, मा. सह पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे, श्री. रामनाथ पोकळे मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्री. अमोल झेंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे २. श्री. नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक-२ गुन्हे शाखा पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक, सुनिल थोपटे, पोलीस उप-निरीक्षक, दिगंबर चव्हाण, पोलीस अंमलदार, संतोष देशपांडे, चेतन गायकवाड, प्रशांत बोमादंडी, संदिप जाधव, रविंद्र रोकडे, साहिल शेख, दिशा खेवलकर, नितीन जगदाळे, युवराज कांबळे, आशीम शेख व दिनेश बास्टेवाड यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment