An Assistant Police Inspector of Kondhwa Police Station Was Arrested By the Anti-Corruption Department | कोंढवा पोलीस ठाणे येथे दुसऱ्यांदा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडाकेबाज कारवाई - PUNE MAJHA NEWS

Breaking

Post Top Ad

 


Friday, 25 November 2022

An Assistant Police Inspector of Kondhwa Police Station Was Arrested By the Anti-Corruption Department | कोंढवा पोलीस ठाणे येथे दुसऱ्यांदा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडाकेबाज कारवाई

कोंढवा पोलीस ठाणे येथे दुसऱ्यांदा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडाकेबाज कारवाई दोन लाखाची लाच मागणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली अटक

पुणे माझा न्युज पुणे प्रतिनिधी : पुणे शहर पोलीस दलात दिवसेंदिवस लाच घेण्याचे प्रकार वाढले असून एक महिन्यापूर्वी महिला पोलीस अधिकारी हर्षदा दगडे यांना लाच मागताना पकडण्यात आले होते हे प्रकरण उघड होताच पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी तातडीने या प्रकारणाची दखल घेत महिला पोलीस अधिकारी हर्षदा दगडे यांना निलंबित केले होते.

या लाच प्रकरणाला एक महिना उलटत नाही तोच दुसऱ्यांदा त्याच पोलीस ठाण्यातील लाच मागण्याची घटना समोर आली आहे कोंढवा पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वराज अनंत पाटील या अधिकाऱ्याला, दोन लाख रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे

जमिनीच्या वादासंदर्भात पत्नीने आणि सासऱ्याने केलेल्या अर्जावर कारवाई न करण्यासाठी दोन लाख रुपये लाचेची मागणी करणाऱ्या पुणे पोलीस दलातील सहायक पोलीस निरीक्षकावर पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.

एकीकडे गृह विभाग ‘खाकीची प्रतिमा’ सुधारण्यासाठी प्रयत्नशील असताना दुसरीकडे शहर पोलीस दलातील कर्मचारी, अधिकारी खाकीला काळिमा फासणारी कृत्ये करत असल्याची बाब उघड झाली आहे. कोंढवा पोलीस ठाण्यात एकाचवेळी अधिकारी, कर्मचारी लाच घेताना पकडले गेले असल्याने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे हा प्रकार नुकताच कोंढवा पोलीस स्टेशन मध्ये घडला असून सदर तक्रारीची दिनांक २५/०५/२०२२ व दि. ०२/०६/२०२२ रोजी पडताळणी केली असता सहायक पोलीस निरीक्षक, स्वराज पाटील यानी दोन लाख रूपयांची लाच मागणी केली म्हणून वरीलप्रमाणे लाच मागणीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


स्वराज आनंद पाटील असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सहायक पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. पुणे एसीबीकडून कोंढवा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे

शासकीय अधिकारी , कर्मचारी / लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास खालील नमूद क्रमांकवर सपंर्क हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक १०६४ साधण्याचे आवाहन श्री. अमोल तांबे , पोलीस अधीक्षक , लाचलुचपत प्रतिबंधक विभाग , पुणे यांनी केले आहे .
अॅन्टी करप्शन ब्युरो , पुणे दुरध्वनी क्रमांक ०२०-२६१२२१३४ , २६१३२८०२,२६०५०४२३ व्हॉट्स अॅप क्रमांक पुणे .

No comments:

Post a Comment

Post Top Ad