विश्रांतवाडी खून प्रकरणात पोलिसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या
पुणे माझा न्युज : प्रतिनिधी पुणे: पुण्यात विश्रांतवाडीतील भीम नगर येथील एका तरुणावर पूर्ववैमनास्यातून हल्ला करण्यात आल्याची माहिती विश्रांतवाडी पोलिसांना मिळाली माहिती मिळताच तपास पथकातील अमंलदारांनी घटना स्थळी भेट दिली. सदर ठिकाणी चौकशी केली असता समजले की, इसम नामे तुषार जयवंत भोसले वय २३ वर्षे रा. दांडेकर पुल, दत्तवाडी, पुणे व इसम नामे भैय्या ऊर्फ फ्रांन्सेस स्वामी उर्फ भैया अंन्थोनी स्वामी यांचेत पुर्वी गाडीली कट मारण्याच्या कारणावरुन झालेल्या भांडणाच्या कारणावरुन दि. ०६/०७/२०२२ रोजी सायंकाळी ०५.०० वा चे सुमारास वडारवस्ती या ठिकाणी त्यांचेत पुन्हा वाद झाले दोघांनीही एकमेकांना धमक्या दिल्या काही वेळातच तुषार भोसले हा त्याचे पत्राचाळ विश्रांतवाडी व जनता वसाहत दत्तवाडी येथील मित्रांना घेवून वडारवस्तीमध्ये आला व भैया याचा शोध घेवू लागला. भैयाचा शोध घेणेसाठी तुषार भोसले व त्याचे मित्र बाळू शिंदे याचे घरामध्ये गेले तेथे बाळू शिंदे यास तुषार भोसले याने मारहाण केली
त्याचा राग येवून बाळू शिंदे हा हातात चाकू घेवून तर बाळू शिंदेचे घराजवळ जमलेले भैया, सर्फराज शेख, अकबर शेख, असे सत्तूर लाकडी बांबू लोखंडी रॉड घेवून तुषारच्या मागे लागल्यावर तुषार व त्याचे बरोबरचे त्याचे मित्र गल्यानमधून पळून जावू लागले त्यांना भैया, बाळू यांचेवर तर या चौघांनीही तुषार व त्याचे मित्रांवर एकमेकांवर दगडफेक केली बाळू शिंदे याने पाठलाग करून तुषार यास पकडून त्यास खाली पाडून तुषारचे पोट व छातीचे मध्ये चाकून भोसकले असता तुषार गंभीर जखमी होवून खाली कोसळला ते पाहून सगळेजण पळून गेले. जखमी तुषार यास त्याचा भाऊ आदित्य व इतरांनी प्रथम खाजगी हॉस्पीटल मध्ये त्यानंतर ससून हॉस्पीटल मध्ये नेले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले. सदर बाबत विश्रांतवाडी पोलीस स्टेशनला गुरनं १८३/२०२२ भादविक ३०२, ३२४, ३४ भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३) सह १३५ प्रमाणे गुन्हा नोंद केला असून वरील गुन्हयातील आरोपींचा शोध घेणेकामी तपास पथकातील अंमलदार यांच्या दोन टीम तयार करून वडारवस्ती, भिमनगर या भागात शोध घेवून गुन्हयातील आरोपी नामे १) बाळू अर्जुन शिंदे वय ४८ वर्षे, रा. सर्वे नं ११२ ब, विश्रांतवाडी पुणे २) फ्रांन्सेस स्वामी ऊफ भैया अंन्थोनी स्वामी वय २० रा सदर ३) सर्फराज सलीम शेख ऊर्फ गोल्या वय २० वर्षे रा. विठठल मंदिरामागे, धानोरी, पुणे ४) अकबर शहाबुददीन शेख वय २२ वर्षे, रा सर्वे न॑ ४६, भिमनगर, विश्रांतवाडी पुणे यांना तात्काळ ताब्यात घेवून तपासाअंती अटक करण्यात
आलेली आहे.
सदरची कारवाई मा. श्री, नामदेव चव्हाण, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रावेशिक विभाग, मा. श्री. रोहिदास पवार, पोलीस उपआयुक्त परिमंडळ ४, पुणे शहर, मा. आरती बनसोडे, सहा.पोलीस आयुक्त खडकी विभाग, पुणे, मा. श्री. दत्तात्रय भापकर, वपोनि विश्रांतवाडी तसेच विजयकुमार शिंदे पो निरीक्षक गुन्हे, यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी श्री लहु सातपुते पोहवा दिपक चव्हाण, पोहवा यशवंत किर्वे, पोना संपत भोसले, संजय बादरे, पोशि संदिप देवकाते, प्रफुल मोरे शेखर खराडे यांचे पथकाने केली आहे.
No comments:
Post a Comment