कोंढवा पोलिसांची कारवाई - मोक्याच्या गुन्ह्यात एक वर्षापासून फरार असणारे तीन आरोपींना अटक
पुणे माझा न्युज - प्रतिनिधी पुणे :- कोंढवा पोलीस ठाणे पुणे गुरन. १११३ / २०२१ भादवि कलम ३०७, १४३, १४७, १४८, १४९ भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५) महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१) सह १३५ क्रिमीनल लॉ ऍक्ट ७ महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंध अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१)(ii) . ३ ( २ ). ३ ( ४ ) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
दाखल गुन्हयातील आरोपी १) चंदू गायकवाड २)करण काळे ३)गणेश नाडे हे गुन्हा केल्यापासुन साधारण एक वर्षोपासुन फरार होते. त्यांचा शोध घेणेकामी सहा. पोलीस आयुक्त, श्रीमती. पोर्णिमा तावरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सरदार पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे), संजय मोगले यांच्या सुचनाप्रमाणे तपास पथक अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक, अनिल सुरवसे, पोलीस अंमलदार, अमोल हिरवे, गणेश चिंचकर, अभिजीत रत्नपारखी, जयदेव भोसले, मरगळे, रासने, दिपक जड़े महेश राठोड असे वेळोवेळी गुप्त माहिती काढुन शोध घेत होते. राहुल वरिलपैकी आरोपी चंद्रकात गौतम गायकवाड, वय २६ वर्षे, रा. सच्चाई माता शेजारी, संतोष नगर, कात्रज, पुणे हा भारती हॉस्पीटल कात्रज येथे चोरुन त्याच्या उपचारासाठी येणार असल्याची माहिती पोलीस अंमलदार अमोल हिरवे, अभिजीत रत्नपारखी, गणेश चिंचकर यांना प्राप्त झाली होती. त्यास भारती हॉस्पीटल येथुन सापळा रचुन ताब्यात घेवुन त्यानंतर मिळालेल्या बातमीवरून सदर आरोपी हे शेळकेवस्ती येथेच लपुन पत्र्याच्या रूम मध्ये राहत असल्याचे सांगुन ते रात्री उशीरा येवुन पहाटे लवकर निघुन जातात अशी माहिती मिळाली. सदर पत्र्याचे रुमची पाहणी केली असता पाहिजे आरोपी १) करण विठ्ठल काळे वय २२ वर्षे रा. पद्मावती वसाहत, शेळकेवस्ती, बिबवेवाडी, पुणे २) गणेश जयजयकार नाडे, वय-२० वर्षे, रा. पद्मावती वसाहत, शेळकेवस्ती, बिबवेवाडी, पुणे हे दोघे रूम मध्ये झोपलेले मिळुन आले. वरिल तीन्ही आरोपी यांना ताब्यात घेवुन दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे.
दाखल गुन्हयाचा अधिक तपास मा. सहायक पोलीस आयुक्त श्रीमती पोर्णिमा तावरे हे करीत आहेत.
सदर कामगिरीबाबत मा. पोलीस आयुक्त श्री. अमिताभ गुप्ता यांनी कोंढवा पोलीस स्टेशनचे कौतुक केले आहे.
No comments:
Post a Comment