Former Corporator Gafoor Pathan Demanded action against Moka | माजी नगरसेवक गफूर पठाण यांचेवर मोका अंतर्गत कारवाईची मागणी असलम इसाक बागवान यांनी केली - PUNE MAJHA NEWS

Breaking

Post Top Ad

 


Wednesday, 29 June 2022

Former Corporator Gafoor Pathan Demanded action against Moka | माजी नगरसेवक गफूर पठाण यांचेवर मोका अंतर्गत कारवाईची मागणी असलम इसाक बागवान यांनी केली

माजी नगरसेवक गफूर पठाण यांचेवर मोका अंतर्गत कारवाईची मागणी


पुणे माझा न्युज : प्रतिनिधी - इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुप या संस्थेचे संस्थापक आणि सामाजिक कार्यकर्ते असलम इसाक बागवान यांना झालेल्या मारहाणीचा निषेध करण्यासाठी सोमवारी कोंढव्यात काढण्यात आलेल्या निषेध पदयात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला बागवान यांना पालिकेजवळ मारहाण झाली असून जिवे मारण्याच्या इराद्याने माजी नगरसेवक गफूर पठाण यांच्याकडून सुपारी घेतलेले गुंड पाठविल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यासंदर्भात शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल  झाली आहे. असलम बागवान यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.२४ जून रोजी ही मारहाणीची घटना घडली उपचारांनंतर बागवान यांनी २५ जून रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.  या घटनेचा निषेध करण्यासाठी सोमवारी २७ जून रोजी दुपारी दीड वाजता निषेध रॅली आयोजित करण्यात आली होती कोंढव्यातील डी एड कॉलेज ते शीतल पेट्रोल पंप या मार्गावर या निषेध रॅलीने मार्गक्रमण केले.
शिवाजीनगर पोलीस ठाण्यात माजी नगरसेवक गफूर पठाण,त्यांचे साथीदार अझर पठाण,कलीम पठाण,रिझवान पठाण यांच्याविरुद्ध कलम ३२३,५०४,५०६,४२७,३४ अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.  

अशोका म्युज शेजारील भैरोबानाला नाला येथे अनधिकृत पणे सिमेंटचे पाईप टाकून रस्ता करत असल्याने या विरूध्द समाजसेवक असलम इसाक बागवान यांनी आक्षेप घेतला आहे.यासंदर्भात तक्रार द्यायला बागवान हे या तक्रारी बाबत पाठपुरावा करायला बांधकाम विभाग, सावरकर भवन येथे गेले असता गफूर पठाण यांनी शिवीगाळ केली आणि नंतर गंधर्व हॉटेल येथे बोलावून साथीदारांकरवी मारहाण केली. या बरोबरच पत्रकार रियाज मुल्ला यांनी या प्रकरणाची सत्यता जनतेपर्यंत बातमीच्या माध्यमातून प्रसिद्ध केली म्हणून नगरसेवक गफूर पठाण व त्यांचे साथीदार हे या पत्रकारास धमकी देत आहेत. पत्रकार रियाज मुल्ला यांच्या जीवाला देखील धोका निर्माण झाला आहे,असे बागवान यांनी सांगितले.मुल्ला हे एका न्यूज पोर्टलचे प्रमुख असून ते केंद्रीय पत्रकार संघाचे अध्यक्ष आहेत.
या  नगरसेवकाने सत्तेचा गैरवापर करून अनेक गैरप्रकार केलेले आहेत.अनधिकृत बांधकामांना अभय देणे, पुणे मनपा ची विजचोरी, अनधिकृत बँनरबाजी, कोविडचे नियम मोडून साजरा केलेले वाढदिवस, तसेच जातीचा खोटा पुरावा देवून केलेली जनतेची व पुणे महानगरपालिका यांची केलेली फसवणूक हे त्यापैकी काही गैरप्रकार  आहेत,असे बागवान यांनी निषेध रॅलीत सांगीतले. तसेच त्याच्यावर असलेल्या तक्रारींची माहिती घेऊन त्यांनी पुणे पोलीस आयुक्तालय येथे गफूर पठाण यांच्यावर मोका अंतर्गत कारवाईची मागणी देखील केली आहे
कोंढव्यात अशोका म्यूज या ठिकाणी नाल्याचे  पात्र कमी  करण्यात आला असून येथे पूरग्रस्त परीस्थिती निर्माण होवून स्थानिक नागरीकांचे मालमत्ता व जीवितहानी तसेच इतर नुकसान होण्याची मोठी शक्यता या पावसाळ्यात निर्माण झाली आहे. त्यामुळे हे अनधिकृत रस्ता त्वरीत कारवाई करून काढून टाकावे तसेच हा रस्ता करताना पुणे मनपा ची सुरक्षा भिंत तसेच ज्या प्लाँट करीता रस्ता केला जात आहे तेथील जुनी शेकडो झाडांचे कत्तल केल्याने गफूर पठाण व अन्य यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा या आशयाचे पत्र दिल्याच्या रागातून गफूर पठाण यांच्या गुंडानी  सापळा रचून तसेच असलम बागवान यांचा पाठलाग करून जिवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला,असा आरोप बागवान यांनी केला आहे.

No comments:

Post a Comment

Post Top Ad