Attempt to kill at Vishrantwadi - Pune Crime News | विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढती गुन्हेगारी.! गुंडाच्या टोळक्याकडून तरुणावर कोयत्याने वार; - PUNE MAJHA NEWS

Breaking

Post Top Ad

 


Wednesday, 29 June 2022

Attempt to kill at Vishrantwadi - Pune Crime News | विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढती गुन्हेगारी.! गुंडाच्या टोळक्याकडून तरुणावर कोयत्याने वार;

गँग कोणाची आहे, हे बघून तरी नादाला लागायचे’ असे म्हणत गुंडाच्या टोळक्याकडून तरुणावर कोयत्याने वार; विश्रांतवाडी, कळस परिसरातील घटना

पुणे माझा न्युज : प्रतिनिधी पुणे - काही दिवसांपूर्वी रस्त्यावरून येत जाता गाडीला कट मारला म्हणून रोहन घोरपडे बरोबर वाद झाला होता. तो सापडला नाही, म्हणून त्याच्या मित्राला रोहन्याला सपोर्ट करतोस काय असे म्हणून गुंडाच्या टोळक्याने फावडे, कोयत्याने वार करुन तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला

कळस परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पुण्यात ठीक ठिकाणी दिवसभरात अनेक घटना घडत असतात अशा गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन कमी पडत असल्याची चर्चा स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे सदर याप्रकरणी कार्तिक अमर तगडपल्ली  (वय 19, रा. कळस, विश्रांतवाडी) याने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात  फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी यश चव्हाण ऊर्फ कॉक्रोच  (वय 21, रा. बोपखेल), आकाश पानबोणे  (वय 20, रा. धानोरी), निरज यादव  (वय 21 रा. वडारवस्ती, आळंदी रोड), संदीप सिता (वय 20, रा. आळंदी रोड), अमोल टाक (वय 21, रा. शांतीनगर, येरवडा) आणि निखिल गोसावी  (वय 21, रा. कळस) व इतर तिघांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. संदीप सिता आणि अमोल टाक यांना अटक करण्यात आली आहे.

 याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कार्तिक याच्यावर ससून रुग्णालयात  उपचार करण्यात येत आहे. तो खडकीतील टी जे कॉलेजमध्ये दुसर्‍या वर्षामध्ये शिकत आहे. रोहन घोरपडे हा त्याचा मित्र आहे. तीन दिवसांपूर्वी तो बनाना चाफ चौकामधून कळसमध्ये त्याच्या मित्रासोबत येत असताना यश चव्हाण याने दुचाकीवरुन कट मारला. त्यावेळी रोहनने मित्राला गाडी बाजूला घे, असे सांगितले. त्यावेळी यश चव्हाण याला त्यालाच गाडी बाजूला घेण्यास सांगितले असे समजून शिवीगाळ केली व मारण्याची धमकी दिली होती.


त्यावेळी त्यांच्यात वाद झाला होता. याचा राग मनात धरुन यश याने फिर्यादीच्या घराजवळ येऊन रोहन घोरपडे कोठे आहे, म्हणून शिवीगाळ केली होती. तसेच शांतीनगर येथे रोहन घोरपडे याच्या जुन्या घराजवळ 10 ते 15 जणांना घेऊन जाऊन त्याला मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी रोहन घोरपडे हा लपून बसला होता. त्याने घाबरुन तक्रार दिली नाही. कार्तिक हा रविवारी सायंकाळी 7 वाजता घरातून बाहेर पडून फिरत छत्रपती चौकाकडे जात होता. त्यावेळी यश हा 5 ते 6 दुचाकीवरुन 10 ते 12 मुलांना घेऊन आला. त्यांच्या हातात लाकडी दांडके, कोयते व रॉड होते. त्यांनी मोठ्या मोठ्याने गाड्यांचे हॉर्न वाजवत आले.


यश याने त्यांच्याकडील फावड्याच्या दांड्याने फिर्यादी याच्या डाव्या हातावर मारले. “रोहन्याला सपोर्ट करतोय काय, त्याला तर सोडणार नाही. पण आता तुमच्यातील एकाची तरी विकेट टाकणार आहे. तुम्हा सर्वांना मस्ती आली आहे. आम्ही कोण आहे, गँग कोणाची आहे, हे बघून तरी नादाला लागायचे,” असे म्हणाला.आकाश पागबोणे याने “अरे बघता काय टाका” असे म्हणून त्याने कोयता कार्तिकच्या डोक्यात मारला. इतरांनी लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने मारहाण केली. तेव्हा कार्तिक चक्कर येऊन खाली पडला. त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तेथे जमलेल्या दोघांकडे पाहून हत्यारे हवेत फिरवत दहशत निर्माण करुन ते पळून गेले. त्यानंतर मित्रांनी कार्तिक याला ससून रुग्णालयात दाखल केले. पोलीस उपनिरीक्षक नरळे तपास करीत आहेत.


No comments:

Post a Comment

Post Top Ad