लष्कर पोलीसांची धडाकेबाज कारवाई ..! चोरीचा गुन्हा केला २४ तासात उघड
पुणे माझा न्युज : प्रतिनिधी पंकेश जाधव पुणे : लष्कर पोलिसांनी चोरी करणाऱ्या महिलेला २४ तासात केली अटक माहिती खालील प्रमाणे एमनेस राफेल, वय ७८ वर्षे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांच्या घरात घरकाम करणारी महीला नाव यास्मिन आतीक शेख, वय ४५ वर्षे हिच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला यावेळी या महीलेला शोध तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक शितलकुमार गायकवाड व तपास पथकाचे टिम सदर महीलेचा तपास करत असताना सदर महीला राहत्या घरी मिळुन आल्याने तिला ताब्यात घेवून तिच्याकडे चोरीस गेले सोन्याचे दागीने व रोख रक्कमे बाबत तपास करता तीने गुन्हाची स्पष्ट कबुली दिल्याने तीला दाखल गुन्हात अटक करून तिच्याकडून रोख रक्कम ३१,०००/- रुपये व सोन्याचे ०३ चैन सोन्याचे ०२ पॅडेन्ट, सोन्याचे ०२ कानातील कर्णफुले, सोन्याचे ०२ बांगडया एकुण ५ तोळे ६ ग्रॅम असे चालू बाजार भावानुसार एकूण २,८१,०००/- रुपयेचा मुद्देमाल जप्त करून लष्कर पोलीसांनी २४ तासात उघड कैली नोकराने केलेली चोरी,
सदरची कामगीरी ही मा. पोलीस उप आयुक्त श्री. सागर पाटील, परि. २. मा. सहा. पोलीस आयुक्त श्री. आर. एन. राजे, लष्कर विभाग पुणे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अशोक कदम व पोनि (गुन्हे) प्रियंका शेळके यांचे नेतृत्वाखाली सहा. पोलीस निरीक्षक गायकवाड, पोलीस उप निरीक्षक डोंगळे, पोहवा महेश कदम, पोना समीर तांबोळी, पौवा किसन भारमळ, पोहवा मंगल लाकडे, पोना गणेश कोळी, पोना रविन मांजरे, पोना अतुल मेगे, पोशि चक्रधर शिरगीरे, पोशि पवण मोराले असे यांनी केलेली आहे. सदरचा तपास श्री शितलकुमार गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक, लष्कर पोलीस स्टेशन पुणे हे करत आहेत.
No comments:
Post a Comment