पुणे माझा न्युज : प्रतिनिधी इम्रान पुनावाला : पुण्यातील बालाजी नगर येथे पारख ज्वेलर्स मधील हि घटना आहे या दुकानाचे मालक आनंद हरीलाल पारख यांचे पारख ज्वेलर्स नावाचे सोन्याचे दागीने खरेदी विक्रीचे दुकान आहे. दि.१०/०३/२०२२ रोजी सदर दुकानात या दोन मुलींनी आंगठी खरेदी करण्याचा बाहणा करुन आनंद पारख यांची नजर चुकवुन आंगठी घेवून पळून गेल्या होत्या. याबाबत स.नगर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ५३ / २०२२ भा.द.वी. कलम ३७९, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता त्या प्रमाणे पोलीस यंत्रणा कमला लागली आणि काही तासात या मुलींना शिताफीने ताब्यात घेतले
या गुन्हयाचा तपास मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई स. नगर पोलीस स्टेशन यांचे अधिपत्याखाली तपास पथकाचे पोलीस अधिकारी बापु सेंगरे व तपास पथकाचे पोलीस अंमलदार करीत होते. दाखल गुन्हाचे अनुषंगाने घटनास्थळ व आजुबाजुचे परिसरातील ७० ते ७५ सि.सि.टी. व्हि. फुटेज चेक करुन माहिती घेत असताना फिर्यादी यांचे दुकानातुन आंगठी चोरुन पळुन जाणा-या मुली एका अॅक्टिवा गाडीवरुन एलोरा पॅलेस कडुन पुणे सातारा रोडने कात्रजकडे जाताना दिसल्या व त्यामध्ये गाडीचा अस्पष्ट नंबर व मॉडेल मिळून आले. गाडीचे मॉडेल व नंबरवरून पुढील तपास करीत असताना पोलीस अंमलदार महेश मंडलीक व प्रदिप बेडीस्कर यांना सदर गाडीचा आरटीओ नंबर एमएच १२ क्युव्हि ०३६८ असल्याचा व ती गाडी स.नं. १६ आंबेगाव पठार भागातील नारायणीनगर परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तपास पथकातील स्टाफने मिळुन सदर भागात सापळा लावुन शोध घेता सदरची गाडी व सि.सि.टी. व्ही. फुटेज मधील वर्णनाच्या दोन मुली सर्व्हे नं.१६ येथील शिवाजी अपार्टमेंटचे खाली गप्पा मारत असताना मिळुन आल्या. त्यांना ताब्यात घेवुन त्यांचे नाव पत्ता विचारता त्यांनी त्यांची नावे १) तेजल दयानंद मुनेश्वर, वय २० वर्षे, धंदा शिक्षण रा.स.नं. १६ शिवनेरी हाईट्स फ्लॅट नं.३०३ तळमजला आंबेगाव पठार पुणे २) सुमेधा उल्हास मुनेश्वर, वय २१ वर्षे, धंदा शिक्षण रा.स.नं. १६ शिवाजी अपार्टमेंट दुसरा मजला आंबेगाव पठार पुणे अशी असल्याची सांगुन सदरचा गुन्हा केल्याची कबुली देवुन त्यांचेकडील दुचाकी हि स्वारगेट पोलीस स्टेशनचे हद्दितील हिराबाग येथुन चोरल्याची माहिती दिली. दोन्ही मुलींना सहकारनगर पोलीस स्टेशन कडील गुन्हयात अटक केली आहे. दोन्ही मुलींकडुन एकुण ४५,०००/- रुपये किमतीची ८ ग्रॅम वजनाची सोन्याची आंगठी व २०,०००/- रुपये किमतीची दुचाकी असा एकुण ६५,०००/- रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे. वरील मुलींकडुन खालील प्रमाणे ०२ गुन्हे उघडकीस आले आहेत.
१) सहकारनगर पोलीस स्टेशन गु.र.नं. ५३ / २०२२ भा.द.वी. कलम ३७९, ३४ २) स्वारगेट पोलीस स्टेशन गु.र.नं.४६ / २०२२ भा.द.वी. कलम ३७९
सदरची कामगीरी मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशीक विभाग डॉ. राजेंद्र डहाळे सो, पोलीस उपायुक्त, परिमंडळ - २, श्री. सागर पाटील, सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग सुषमा चव्हाण मॅडम, वपोनिरी श्रीमती स्वाती देसाई यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस अधिकारी बापु खेंगरे पोलीस अंमलदार बापु खुटवड, महादेव नाळे, भुजंग इंगळे, सागर सुतकर, महेश मंडलिक, प्रदिप बेडीस्कर म.पो.अंमलदार रेखा यादव यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment