पुणे माझा न्युज : प्रतिनिधी इम्रान पुनावाला : सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दित धनकवडी स्मशानभुमीत दारु पिण्याचे किरकोळ कारणावरुन सुरज विजय मरळ, वय २८ वर्षे, रा.धनकवडी ०७/०३/२०२२ रोजी रात्री ०१.३० वा. सिमेंटचे गट्टूने डोक्यात मारुन अंगावर पेट्रोल टाकुन जाळुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्याला सहकार नगर पोलिसांनी केली अटक सदर बाबत सुरज मरळ याने दिलेल्या फिर्यादी नुसार स. नगर पोलीस स्टेशन गु.र.नं.५१/२०२२ भा.द.वि. कलम ३०७,५०४ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.
दाखल गुन्हयाचा तपास मा वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई स. नगर पोलीस स्टेशन यांचे अधिपत्याखाली तपास पथकाचे पोलीस अधिकारी बापु खेंगरे व तपास पथकाचे पोलीस अंमलदार करीत होते. दाखल गुन्हाचे अनुषंगाने घटनास्थळ परिसरातील सि.सि. टी.व्हि. फुटेज चेक करीत असताना फिर्यादी यांचे अंगावर पेट्रोल टाकुन जाळुन जिवे मारण्याचा प्रयत्न करणारा आरोपी गोवींदा ऊर्फ प्रेमकुमार यादव हा के के मार्केट येथील एका गॅरेज जवळ त्याचे मित्रास भेटण्यास येणार असून तो त्याचे मुळ बिहार राज्यातील गावाला पळून जाण्याच्या तयारीत आहे अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक बापु खेंगरे व पोलीस अंमलदार सागर सुतकर यांना मिळाली. लागलीच सदर बाबत वरिष्ठांना माहिती देवुन तपास पथकातील स्टाफसह के. के. मार्केट परिसरात जावुन शोध घेता गोर्वीद यादव हा एका टेम्पोच्या आडोशाला उभा असल्याचा दिसला. त्यास ताब्यात घेवून त्यांचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव १) गोवींदा ऊर्फ प्रेमकुमार यादव वय ३३ वर्षे रा. खोपडेनगर गुजर निंबाळकरवाडी कात्रज पुणे असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे चौकशी करता त्याने धनकवडी स्मशानभुमीत एकत्र दारु पित असताना सागर मरळ याने शिवीगाळ केल्याने त्यास सिमेंटचे गहुने मारहाण करून त्याचे सोबत असलेल्या बाटलीतील पेट्रोल टाकुन जाळुन त्यास जिवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगुन त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.
सदरची कामगीरी मा अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशीक विभाग डॉ. राजेंद्र डहाळे सो, पोलीस उपायुक्त, परिमंडळ - २ श्री. सागर पाटील, सहा. पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग सुषमा चव्हाण, वपोनि स्वाती देसाई यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक उमेश लोंढे सहकारनगर तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक बापु खेंगरे पोलीस अंमलदार बापु खुटवड, सोपान नावडकर, अमोल गुरव, महादेव नाळे, भुजंग इंगळे, प्रदिप बेडीस्कर, सागर सुतकर, प्रविण कोकणे, शिवा खेड, मंगेश बो-हाडे यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment