पालकांसाठी एक दिलासा.. !! आरटीई प्रवेशास २९ एप्रिलपर्यंत मुदतवाढ
पुणे माझा न्युज : प्रतिनिधी खालिक शेख पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांवर लॉटरीद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना येत्या २० एप्रिलपर्यंत प्रवेश घेण्यास मुदत दिली होती. परंतु, शिक्षण विभागाने प्रवेशासाठी २९ एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे प्रवेश इच्छुक पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आरटीई प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात आले. पुणे जिल्ह्यात ९५७ शाळांमधील १५ हजार १२६ जागांसाठी ६२ हजार ९६० विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केले. त्यातील १४ हजार ९५८ विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड करण्यात आली आहे. तर ५ हजार २३ विद्यार्थ्यांनी ऍडमिशन कन्फर्म केले आहेत.
मध्यतंरी ४ दिवस सरकारी सुट्टी असल्याने अनेक जणांना याचा त्रास झाला तसेच पुण्यात तलाठी लोकांचा संप असल्याने उत्पन्न दाखल्यासाठी पालकांना हेलपाटे मारावे लागत आहेत याचाच गैर फायदा घेऊन एजंट लोक पालकांकडून ज्यादा पैसे उकळण्याचे प्रकार देखील सुरु आहेत. यात पालकांची भरड होताना दिसत आहे त्याच बरोबर अनेक जणांचे कागदपत्र जमा झाले नसलेने प्रवेशासाठी अडचणी येत आहे पालकांना आवश्यक कागदपत्रे जमा करण्यास आणखी वेळ हवी आहे. त्यामुळे मुदतवाढीची मागणी होत आहे.
यासाठी प्रवेशासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी पालकांकडून केली जात होती. त्यानुसार शिक्षण विभागाने येत्या २९ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.
एखादा अधिकारी किंवा एजंट आपली अडवणूक करत असतील तर कृपया आम्हाला संपर्क करा :
इम्रान खान - +91 8999427628 / अण्णा बसवराज - +91 8888556931 / सलीम खान - +91 9860007879
विशाल बेंगळे- +91 8796969625 / रियाज मुल्ला - +91 7020873300
No comments:
Post a Comment