Finally Victory ..! The Awaken India Movement in Pune opposes compulsory vaccination in schools
पुणे माझा न्युज : प्रतिनिधी खालिक शेख पुणे - आज राज्य सरकार कडून महाराष्ट्र राज्यात सर्व शाळा महाविद्यालयात लसीकरण सक्ती केली असल्याने राज्यात एक घबराटीचे वातावरण झाले असून पालकांमध्ये याची भीती निर्माण झाली आहे सदर लसीकरणामुळे लोक मरत आहेत केंद्र सरकारने लसीकरण स्वैच्छिक केले असले तरी राज्य सरकार सक्ती करताना दिसून येत आहे सुप्रीम कोर्टाने देखील मास्क व लसीकरणा विरोधात आपले आदेश काढले आहेत त्याच बरोबर हेल्थ मिनिस्ट्री ने देखील याला स्वैच्छिक सांगितले आहे
तरी देखील काही दिवसांपूर्वी शिक्षण मंडळाकडून एक आदेश काढण्यात आला होता या आदेशात १० /१२ वीच्या परीक्षेपूर्वी सर्वांचे लसीकरण १००% पूर्ण करून घेण्यास सांगितले होते यामुळे शाळांनी आदेशाची अंलबजावणी करताना शाळेत येणाऱ्या सर्व विध्यार्थ्यांना लसीकरण करण्यास सांगितले परंतु आपल्या मुलाच्या काळजीत असणारे पालक यांनी अवेकन इंडिया मोव्हमेंटच्या सदस्यांशी संपर्क केला असता त्यांनी याची दखल घेऊन पुण्यातील सर्व शाळा / कॉलेज यांना ई-मेल द्वारे नोटिसा पाठवल्या काही शाळा / कॉलेज यांनी या ई-मेल ला उत्तर देखील दिले आहे. त्या नंतर काही शाळा / कॉलेज यांनी वरिष्ठांचे आदेश आहेत म्हणून हाथ झटकून दिले होते या करिता अवेकन इंडिया मोव्हमेंट पुणे टीमने याची दखल घेऊन तत्काळ शिक्षण मंडळ अधिकारी यांची भेट घेऊन हे आदेश त्वरित रद्द करून सुधारीत आदेश काढण्यासाठी निवेदन दिले होते त्यानुसार शिक्षण अधिकारी महेश पालकर यांनी आज सोमवार दिनांक 14 फेब्रुवारी 2022 ला सुधारीत आदेश काढून अवेकन इंडिया मोव्हमेंटला आणि महाराष्ट्रातील जनतेस न्याय दिला आहे राज्यभर या चळवळीचे कौतुक केले जात आहे
No comments:
Post a Comment