धोरणा नुसार खाजगी नावे देवू नये याची मागणी इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष असलम इसाक बागवान यांनी केली
पुणे महानगरपालिका असेल अथवा इतर पालिका या पुढे चौकाला, पथ, शाळा, लायब्ररी, गार्डन, हॉस्पिटल, दवाखाना, स्विमिंग पुल, अभ्यासिका, विरंगुळा केंद्र यांना नामकरण करण्यासंदर्भात एक धोरण ठरलेले आहे. प्रथम नाम विभागामध्ये प्रस्ताव सादर करून तो सर्वसाधरण सभेत मांडून ठराव करून घेणे हे महाराष्ट्र महानगरपालिका आधिनियमन 1949 मध्ये नमूद केलेले असतानाही आज कोणी ही त्याच्या नातेवाईक, गावकरी, भाईबंद यांचे नावे देताना आपल्या निदर्शनास येत आहे.
कृपया कोणाचे ही नाव देताना सभागृहातून पारीत झालेला ठराव हा सर्व जनतेस दिसेल आणि ठळक अक्षरातील मंजूरी पत्र हे संबधित ठिकाण लावणे आवश्यक आहे.
माझा सर्व समस्त आणि सुज्ञ नागरीकांना प्रश्न आहे की आपण या देशाचे मालक या नात्याने या बाबतची चौकशी अथवा अक्षेप घेतलेला आहे का ?
तर आप आपल्या भागातील पथ, चौक, शाळा, दवाखाने, गार्डन इत्यादी ठिकाणी जी नावे देण्यात आलेली आहेत ती मंजूर करण्यात आलेली आहे किंवा कसे हा प्रश्न विचारणे हे आपले हक्क आणि अधिकार आहे कारण ते जनतेच्या कर-रूपी पैशातून निर्मित केलेले आहे सदस्याने याला घरचा पैसा लावलेला नसल्याने त्याच्या मर्जीने एखाद्या वास्तूस नाव देणे हे असंविधानीक असून भारतातील महान महामानवांचा अनादर आहे. 2011 चे धोरणांनुसार उदाहरणार्थ नावे देताना मदर टेरीसा, सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, अहिल्याबाई होळकर, सरहद गांधी खान, अब्दुल गफ्फार खान, आण्णाभाऊ साठे, लहुजी वस्ताद, डाँ. एपीजे अब्दुल कलाम, अशा थोर महा मानवांचेच नावे देण्यात यावे.
असे असतानाही आपण सर्वच भागात आपल्या प्रभागात पहात असाल की आपल्या नातेवाईकांचे जवळचे पक्षातील पदाधिकारी याची नावे देण्याची स्पर्धाच लागलेली आपणास दिसेल असे मत संविधान अभ्यासक असलम इसाक बागवान यांनी केले
No comments:
Post a Comment