प्रशांत जगताप यांचा मुस्लिम समाजा सोबत एकाला उपाशी तर दुसरा तुपाशी
दुजाभाव करत भावी नगरसेवकांना लावले कामाला
पुणे माझा न्युज । प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीसाठी महायुती व महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर झाले आहेत. दोन्ही महायुती व महाविकास आघाडीचे उमेदवार प्रचाराला सुद्धा लागलेले असताना विधानसभा निवडणुकीत सर्वसामान्य शिव सैनिक व कार्यकर्ता यांची मात्र मनस्थितीत नसताना पाहायला मिळत आहे. लोकसभेत फक्त वापर करून घेतला तसा वापर या विधानसभेत होत असल्याचा आरोप यावेळी कार्यकर्त्यांनी केला आहे
प्रशांत जगताप यांना महाविकास आघाडी ने उमेदवारी जाहीर केली तसं जगताप यांनी कार्यकर्त्यांनी वाळीत टाकल्याचे सांगितले जात आहे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी महाविकास आघाडी उमेदवाराच्या प्रचारासाठी पुढाकार घेतला असता प्रशांत जगताप यांचेकडून कसलाही प्रतिसाद किंवा विचारपूस केली जात नाही तसेच "मुस्लिम मते कुठे जात नाही" असा गैरसमज जगताप यांनी पाळला असून तो येत्या २० नोव्हेंबरला आम्ही तो दूर करू असेही यावेळी सांगण्यात आले
त्याचबरोबर कोंढवा भागात प्रशांत जगताप यांचा बराच भाग असा आहे की ज्या ठिकाणी जगताप यांना जड जाणार आहे या ठिकाणी त्यांचा जनसंपर्क अधिक नसून त्यांच्या बरोबरीला माजी आमदार चेतन तुपे हे उमेदवार म्हणून उभे आहेत अश्यातच जर कार्यकर्त्याला हाताशी घेतले नाही तर या निवडणूकित जगताप यांना सर्वसामान्य निष्ठावंत कार्यकर्ता प्रचारापासून आलिप्त दिसून येणार आहेत
गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी हडपसर विधानसभेत आजी-माजी आमदार, नगरसेवक व प्रस्थापित नेत्यांनी तसेच बहुसंख्य मुस्लिम समाजाने महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या विजयासाठी जोरदार ताकद लावली होती. लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेसचे सर्वसामान्य निष्ठावंत कार्यकर्ते एकाकी लढा देत होते. ज्या महाविकास आघाडीसाठी कोंढवा,सय्यद नगर, हडपसर भागातून सर्व मुस्लिम समाजाने भरभरून मतदान केले त्याच महाविकास आघाडीकडे मुस्लिम समाजाने मुस्लिम उमेदवारी मागितली होती परंतु महाविकास आघाडीने पुन्हा एकदा मुस्लिम समाजावर अन्याय केला आहे असाही आरोप यावेळी करण्यात आला
काही स्थानिक पदाधिकारी लोकांनी जुळवून घेतले असले तरी सर्वसामान्य शिवसैनिक व इतर कार्यकर्ते लोकसभा निवडणूकीतील विजय मिळवण्यासाठी यांचा मोलाचा वाटा आहे हे महाविकास अगजाडीने विसरू नये असेही यावेळी सांगण्यात आले. हडपसर मतदारसंघात चेतन तुपे यांना मानणारा मतदार मोठ्या संख्येने असल्याने सर्वसामान्य निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या नाराजीचा परिणाम या विधानसभा निवडणुकीत नक्कीच दिसून येणार आहे.
कोंढवा-सय्यद नगर येथील स्थानिक पदाधिकारी, नेते त्यांचे गणिते लक्षात घेऊन प्रचाराला लागले असले तरी सर्वसामान्य कार्यकर्ता आज संभ्रमावस्थेत आहे. सध्या तरी या विधानसभा निवडणुकीत कोणताही झेंडा हाती न घेण्याचा निर्णय काही सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी घेतलेला दिसून येत आहे.
या संभ्रम आवस्थेत आसलेल्या काही स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकारी या निष्ठावंतांची समजूत काढण्यात महाविकास आघाडीला यश येते का? अथवा हे कार्यकर्ते कोणाला जाहीर किंवा छुपा समर्थन देणार हे आगामी काळातच स्पष्ट होईल
No comments:
Post a Comment