Eid Milad News Update | पुण्यात ईद-ए-मिलाद निमित्ताने सिरत कमिटीच्या मनमानी निर्णयाविरुद्ध शेकडो मंडळांनी पुकारला बंड, पुणे पोलिसांची भूमिका संशयाच्या भोऱ्यात ? - PUNE MAJHA NEWS

Breaking

Post Top Ad

 


Monday, 9 September 2024

Eid Milad News Update | पुण्यात ईद-ए-मिलाद निमित्ताने सिरत कमिटीच्या मनमानी निर्णयाविरुद्ध शेकडो मंडळांनी पुकारला बंड, पुणे पोलिसांची भूमिका संशयाच्या भोऱ्यात ?

पुण्यात ईद-ए-मिलाद निमित्ताने सिरत कमिटीच्या मनमानी निर्णयाविरुद्ध शेकडो मंडळांनी पुकारला बंड, पुणे पोलिसांची भूमिका संशयाच्या भोऱ्यात ?


सिरत कमिटी फक्त चॉंद आणि ईद-ए-मिलाद पुरतीच आहे का ? तरूणांनी कमिटीच्या कारभारावर उपस्थित केला प्रश्न चिन्ह?


पुणे माझा न्युज :  प्रतिनिधी - पुणे शहरात सध्या १६ सप्टेंबर २०२४ रोजी मो.पैगंबर साहेबांची जयंती होणार होती.परंतु १६ सप्टेंबर रोजी काही ठिकाणी गणेश विसर्जन मिरवणूक निघत असल्याने मुस्लिम समाजातील संस्था, संघटना, मौलाना यांनी पोलिसांशी सल्लामसलत करून सदरील १६ सप्टेंबर रोजी निघणारी मिरवणुक २१ सप्टेंबर २०२४ शनिवारी रोजी काढणार असल्याचे जाहीर केले आहे. परंतु सिरत कमिटीने तरूण मंडळाना विश्वासात न घेता एक हाती निर्णय घेतल्याने तरूणांनी याचा निषेध व्यक्त केला आहे. 

काही दिवसांपूर्वी ईद-ए-मिलाद निमित्ताने ॲडिशनल पोलीस कमिशनर रंजनकुमार शर्मा यांनी एका व्हिडिओ द्वारे सुचना जारी केली होती की,या वेळी ईद-ए- मिलाद च्या दिवशी डीजे ( DJ) ला पुणे पोलीस परवानगी दिली जाणार नाही? या व्हिडिओ नंतर तरूणांनी कमिटीच्या कारभारा विरूद्ध रोष व्यक्त केला. त्यानंतर पुणे लष्कर पोलिस ठाण्यात जाऊन परवानगी मागितली असताना लष्कर पोलिसांनी अर्ज न स्विकारता काही मंडळाच्या कार्यकर्त्यांना हाकलून लावले. अश्या या पोलिसांच्या भुमिकेने तरूणांनी नाराजी व्यक्त केली आहे. आमच्या आनंदावर गदा आणण्याचा अधिकार कोणी दिला? सिरत कमिटीला सकाळी मिरवणूक काढायची असेल तर त्यांनी खुशाल सकाळी काळावी? परंतु तरुणांची मुस्कटबाजी अजिबात करू नये ? आम्हाला पण कळत पैगंबर साहेबांची ही शिकवण नाही की, डीजे वाजवायची. परंतु आम्ही साउंड वर फक्त कवाली, नातच वाजवत आणार ? परंतु २०० पेक्षा जास्त मंडळ सहभागी होतात. यावर पोलिसांनी सिरत कमिटीची बाजू धरून आमच्याशी दुजाभाव करू नये? पोलिस प्रशासनानी याची तात्काळ दखल घेण्याची मागणी मंडळांनी पोलिस आयुक्तांना केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Top Ad