TikTok मौलाना अब्दुल रशीद मिफ्ताही सह 4 जणांवर MPID कायद्याखाली गुन्हा दाखल । 1 कोटी 16 लाखांच्या फसवणूक प्रकारण
पुणे माझा न्युज । प्रतिनिधी : आज एखाद्या चित्रपटातील गाणे जसं असतं तसंच काहीसं कोंढवा परिसरात झालं आहे गाणं आहे "भोली सूरत दिल के खोटे नाम बड़े और दर्शन छोटे" कोंढव्यातील साद मोटर्स (Saad Motors ) या गाड्या खरेदी विक्रीच्या व्यवसायात गुंतवणुक केल्यास महिना २ ते ३ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून ९ जणांची तब्बल १ कोटी १६ लाख रुपयांची फसवणूक (Cheating Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत निसार बाबुलाल शेख (वय ५५, रा. चिंतामणीनगर, हडपसर) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी रफिक कलंदर खान (वय ४४), सनोबर ऊर्फ सौदा रफिक खान (वय ४०), इसा रफिक खान (वय २३), TikTok मौलाना उर्फ अब्दुल रशीद मिफ्ताही ऊर्फ मिफ्ताही कलंदर खान (वय ४८, सर्व रा. भाग्योदयनगर, कोंढवा खुर्द ) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २०२० पासून आजपर्यंत घडला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिठानगर येथे साद मोटर्स नावाचे कार्यालय आहे. आरोपींनी फिर्यादी यांना साद मोटर्स नावाच्या गाड्यांचे खरेदी विक्री व्यवसायात पैसे गुंतविल्यास दर महा २% ते ३% टक्के परतावा देतो, असे आमिष दाखविले. त्यानुसार फिर्यादी व अनिकेत गायकवाड, हमीद बाबुलाल शेख, जुलेखा समीर शेख, अझीम राजूभाई मुलानी, संदीप बधे, जहांगीर पठाण, विशाल चव्हाण, समीर रज्जाक शेख यांनी तब्बल १ कोटी १६ लाख ९३ हजार ५०० रुपयांची गुंतवणुक केली. त्यानंतर गेल्या चार वर्षात आरोपींनी परतावा तसेच मुद्दलही परत दिली नाही. नाईलाजास्तव शेवटी त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे. पोलिसांनी महाराष्ट्र ठेवीदारांच्या हिसंबंधाचे संरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक गुन्हे मानसिंग पाटील तपास करीत आहेत.
No comments:
Post a Comment