KONDWA NEWS - नगरसेवक गफूर पठाण यांच्यावर गुन्हा दाखल करा - इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुपची मागणी - PUNE MAJHA NEWS

Breaking

Post Top Ad

 


Monday, 18 October 2021

KONDWA NEWS - नगरसेवक गफूर पठाण यांच्यावर गुन्हा दाखल करा - इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुपची मागणी

पुणे माझा न्यूज : प्रतिनिधी पुणे : १४ ऑक्टोबर रोजी आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी संपूर्ण परिसरात फ्लेक्स लावण्यात आले जवळ जवळ १०० हुन अधिक फ्लेक्स लावून शहर विद्रुपीकरण करण्यात आले तसेच कोविड १९ चे नियम धाब्यावर बसवत लोकांच्या जीवाची पर्वा न करणारे नगरसेवक यांनी आपला वाढदिवस नियमाचे उल्लंघन करून साजरा केला याबाबत पोलिसांनी आयोजकांवर गुन्हा दाखल केला आहे याला सर्वस्वी जवाबदार म्हणून हे नगरसेवकच आहेत म्हणून याबाबत इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुपचे अध्यक्ष असलम बागवान यांनी गफूर पठाण व शहरविद्रुपीकरण करणाऱ्यांविरुद्ध तक्रार कोंढवा पोलीस दिली आहे 

कलम १८८, २६९, २७०,राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा ५१/ब, महाराष्ट्र कोविड -१९ उपायोजना २०२० चे कलम ११, नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा तपास पोलीस अधिकारी पी.एन. मुघल करीत आहेत 

प्रभाग क्रमांक 27 चे नगरसेवक गफूर अहमद पठाण हे वारंवार नियमांना धाब्यावर बसवून कोंढवा भागात शहरीविद्वपीकरण सारखा गुन्हा करीत असल्याची तक्रार असलम बागवान यांनी कोढवा पोलिस स्टेशन येथे करीत असतात.  पालिका सदस्य तथा नगरसेवक पदाचा गैरवापर करून गफुर पठाण यांचे हे नित्यनियमीत कामच बनलेले आहे दिनांक 14/10/2021 रोजी या मान्यवराचा वाढदिवस होता दिनांक 10/10/2021 पासून कोंढव्यात शेकडो धोकादायक बॅनर तर लावलेच तसेच रस्त्याच्या मधोमध बॅनर लावून वाहतूकीस अडथळा हि निर्माण केला.

तसेच वाढदिवसाच्या दिवशी म्हणजेच 14/10/2021 रोजी कोंढवा पोलिस स्टेशन याची 50 नागरीकांची परवानगी असताना हि हजारो नागरिक आणि लहान लहान मुलांना गोळा करून कोविड १९ नियमांचे उल्लंघन करून पुणे महानगरपालिकेच्या क्रिडांगणावर उघड्यावर जेवनाचे आयोजन करून लहान मुलांना व हजारो नागरीकांच्या आरोग्याशी खेळण्याचे कृत्य या मान्यवराने केलेले असून या करीता कोविड नियमांचे उल्लंघन, गर्दिगोळा करणे, उघड्यावर (क्रिडांगणावर) जेवण घालणे, विनापरवाना बॅनर लावून शहरविद्रुपीकरण करून , धोकादायक बॅनर लावण्यात आलेत असे या तक्रार पत्रात लिहले गेले आहे तसेच  गरीकांच्या जिविताशी खेळणे, वाहतूकीस अडथळा निर्माण करणे अशा प्रकारचे गुन्हे करतानाही थोडासा हि विचार केला गेला नाही यामुळे कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता Section 188 of IPC for Breaking COVID-19 Rules आय पी सी कलम 269 मध्ये निष्काळजी कृत्याचा समावेश आहे ज्यामुळे जीवासाठी धोकादायक अशा रोगाचा संसर्ग पसरण्याची शक्यता आहे. आयपीसी कलम 270 मध्ये एक घातक कृत्याचा समावेश आहे ज्यामुळे रोगाचा संसर्ग पसरण्याची शक्यता आहे जी जीवाला धोकादायक आहे. या अंतर्गत आपण नगरसेवक गफूर अहमद पठाण यांच्यावर त्वरीत गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली 

No comments:

Post a Comment

Post Top Ad