पुणे माझा न्यूज कराड जि सातारा - प्रितिनिधी वसीम आत्तार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहेत तर अनावश्यक फिरणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई देखील करण्यात येत आहे काही दिवसापूर्वी आपली आई आजारी असल्याने पुण्याहून एक जोडपे इचलकरंजी कडे आपल्या दुचाकीवरून निघाले असता या दाम्पत्याची तासवडे (तालुका कराड) येथील टोल नाक्यावर सोने चांदीच्या दागिने सह रोख रकमेची
पर्स पडली .त्या ठिकाणी कार्यरत असणारे तळबीड पोलीस ठाण्याचे वाहतूक पोलीस कर्मचारी निलेश विभुते यांना ती सापडली .त्यांनी ती सहाय्यक पोलीस निरीक्षक जयश्री पाटील यांच्या उपस्थितीत संबंधित दांपत्याला प्रामाणिकपणे परत केली . तळबीड पोलिस स्टेशनचे वाहतूक कर्मचारी विभुते हे आज सकाळी दहाच्या सुमारास नेहमीप्रमाणे तासवडे टोलनाक्यावर कर्तव्य बजावत होते. त्यादरम्यान त्यांना टोल नाक्यावरील पुण्याहून कोल्हापूर कडे जाणाऱ्या लेन वर एक पर्स पडल्याचे दिसले त्यांनी त्या पर्सची तपासणी केल्यावर त्यांना त्यात सोने चांदीच्या दागिन्या सह रोख रक्कम मोबाईल असल्याचे दिसले .
No comments:
Post a Comment