AIMIM PUNE : पुणे शहर व जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील रिक्त पदे भरण्यासाठी एमआयएमची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - PUNE MAJHA NEWS

Breaking

Post Top Ad

 


Sunday, 9 May 2021

AIMIM PUNE : पुणे शहर व जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील रिक्त पदे भरण्यासाठी एमआयएमची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पुणे शहर व जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील रिक्त पदे भरण्यासाठी एमआयएमची  मुख्यमंत्र्यांकडे मागणी  इंजेक्शन, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड उपलब्ध करण्याची देखील केली मागणी

पुणे माझा न्युज प्रतिनिधी : पुणे शहर व जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील रिक्त पदे भरण्याच्या मागणी करीता आणि इंजेक्शन, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड उपलब्ध करण्याच्या मागणी करीता एमआयएम चे पुणे जिल्हा अध्यक्ष फैयाज शेख यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिले आहे.

पुणे शहर व जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता सर्वच रुग्णालयात डॉक्टर, नर्स, टेक्निशियन व इतर कामगार यांची मोठ्या प्रमाणात कमतरता भासत आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना योग्य उपचार मिळत नाहीत. परिणामी रुग्णांना आपला


जिव गमवावा लागत आहे. तसेच रुग्णालयात औषध, इंजेक्शन व व्हेंटिलेटर रुग्णांना उपलब्ध होत नाही. उलट तेथील डॉक्टर रुग्णांच्या नातेवाईकांना ते बाहेरून आणण्यासाठी सांगत आहेत. येथे येणारे रुग्ण गरीब कष्टकरी व आर्थिक दृष्ट्या मागास आहेत. त्यामुळे त्याला औषध उपलब्ध करताना मोठ्या समस्या निर्माण होत आहेत.



या सर्व समस्याच गांभीर्य लक्षात घेऊन वरील सर्व समस्या त्वरित मार्गी लावाव्यात व लोकांचे जिव वाचवावे. या वायरसमुळे येणाऱ्या काळातील समस्या दूर करण्यासाठी आरोग्य सेवा अधिक मजबूत करणे हा एकमेव पर्याय

आहे. तसेच पुणे शहर व जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयात रुग्णांना त्याचा हक्क अधिकार मिळवून द्यावे अशी विनंती एमआयएम चे पुणे जिल्हाध्यक्ष फैयाज शेख यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि जिल्हाधिकारी यांना लिहिलेल्या पत्रात म्हंटल आहे.

No comments:

Post a Comment

Post Top Ad