पुणे माझा न्युज प्रतिनिधी पुणे शहर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिवसेंदिवस पुणे शहरात कडक निर्बंध लावले जात आहेत अशातच काही ठिकाणी याचा फायदा घेऊन चढ्या दराने गुटखा, दारू तसेच अंमली पदार्थाची विक्री, सर्रास पणे केली जात असल्याची माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी मिळाल्याने त्यांनी
त्यांच्या पथकाला कामाला लावून अंमली पदार्थ विक्री करणारे लोकांबाबत माहिती काढून याचा शोध घेण्याची सूचना दिली असता दिनांक २१/०४/२०२१ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक १ कडील अधिकारी व स्टाफ हे कोंढवा पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात अंमली पदार्थ गैरव्यवहाराचे अनुषंगाने पेट्रोलिंग करत फिरत असताना रात्रौ ०२.५० वा.चे सुमारास पुणे सर्व्हे नंबर ७/३/२ पिसोळी येथील ब्रुक फिल्ड सोसायटीचे गेट समोर सार्वजनिक रोडवर सार्वजनिक ठिकाणी नायजेरीयन इसम नामे शमसीद्दीन ओमोटोला हसन , वय ४८ वर्षे , रा.सांकला एक्सक्ल्युसीव व्हिस्टा सोसायटी बिल्डींग नंबर ए फ्लॅट नंबर ७०२ , पिसोळी पुणे मुळ रा . लगोस , नायजेरिया हा ५२ ग्रॅम ‘ कोकेन ‘ हा अंमली पदार्थ , किं.रु. ४,१६,००० / – , पाच मोबाईल फोन कि रु १५००० / – एक यामाहा कंपनीची मोटारसायकल कि रु ५०,००० / -रु.रोख रुपये २०,००० / एक ईलेक्ट्रॉनिक्स वजन काटा कि रु १००० / – असा एकुण ५,०२,००० / -रु.चा ऐवज अनाधिकाराने , बेकायदेशिररित्या विक्री करीता जवळ बाळगताना मिळुन आला आहे .
म्हणुन त्याचे विरुध्द कोंढवा पो.स्टे . गु.र.नं .३३२ / २०२१ , एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ ( क ) , २२ ( ब ) प्रमाणे गुन्हा दाखल करुन त्याला दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे .
सदरची कारवाई श्री . अशोक मोराळे , अपर पोलीस आयुक्त गुन्हे, श्री.श्रीनिवास घाडगे पोलीस उप आयुक्त गुन्हे, पुणे , श्री.सुरेंद्रनाथ देशमुख सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे १ , यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड , सहा.पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे , पोलीस अंमलदार प्रविण शिर्के , सुजित वाडेकर , मारुती पारधी , पांडुरंग पवार , राहुल जोशी , संदिप जाधव , मनोज साळुके , प्रविण उत्तेकर , संदेश काकडे , विशाल दळवी , विशाल शिंदे , योगेश मोहिते यांनी केली आहे .
No comments:
Post a Comment