पुणे माझा न्यूज ; प्रितिनिधी ( गफूर शेख ) – आज देशात कोरोनाची दुसरी लाट थैमान घालत असून जागो जागी लॉकडाउन लावण्यात आला आहे यामुळे आर्थिक परिस्थिती नाजूक असलेल्या गरीब व गरजू लोकांचे हाल होत आहेत या करिता दारुस्सलाम चॅरिटेबट्रस्ट ही संघटना गेल्या लॉकडाउन पासून सतत गरीब लोकांसाठी कार्यरत आहे.
कोरोनाच्या पहिल्या लॉकडाऊनमध्ये लाखो लोकांचे कामधंदे बंद पडले होते. यावेळी हजारो गोरगरीबांच्या हाताला काम नाही, अशा वेळी दारुस्सलाम चॅरिटेबल ट्रस्ट माध्यमातून अनेक गरीब व गरजू लोकांना धान्य वाटप करण्यात आले.
कोरोनाच्या या दुसर्या लाटेच्या वेळी पुन्हा एकदा लॉकडाऊन आला. त्यात पवित्र रमजान महिना आला. या वेळी पुन्हा एकदा दारुस्सलाम चॅरिटेबल ट्रस्ट गोरगरीबांच्या मदतीला पुढे सरसावली आहे . यावेळी १५० हुन अधिक लोकांना अन्न धान्य किट व कोरोना च्या काळात त्यांनी संजय पार्क या ठिकाणी जनसेवा क्लिनिक देखील सुरू करण्यात आले.सदर क्लिनिक चे उदघाटन स्थानिक नगरसेवक राहुल आप्पा भंडारे यांच्या हस्ते करण्यात आले.
एक अत्यंत स्तुत्य उपक्रम ट्रस्टच्या माध्यमातून सुरू केला आहे.येणा-या रुग्णांची फक्त २० रूपयात तपासणी केली जाणार आहे.रक्त तपासणी, मधुमेह, सोनोग्राफी, अश्या विविध विविध प्रकारच्या तपासण्या अत्यंत माफक दरात उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.असे मौलाना शकील यांनी पुणे माझा न्यूजच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले याप्रसंगी आसिफ भाई खोकर, मौलाना शकिलजी, जावेद भाई शेख, शफी चाऊस,डॉ.प्रशांत, हाज्जू भाई उपस्थित होते
No comments:
Post a Comment