पुणे माझा न्यूज प्रतिनिधी : वसीम अत्तार, कराड : तौकते वादळामुळे शेतकऱ्यांच्या वरती हवालदिल होण्याची वेळ सध्या सुरु असलेले कोरोनाच्या कहर ने सर्वसामान्य जनता बेहाल झाली असून लोकांचे हाल होत आहेत त्यातच या तौकते वादळाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या वरती हवालदिल होण्याची वेळ आली आहे
अवकाळी पावसामुळे आणि येणाऱ्या वादळामुळे जे नुकसान झाले आहे त्याची पाहणी करण्यासाठी सातारा जिल्ह्याचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी घटना स्थळी भेट दिली.
तौकते वादळामुळे नुकसान झालेल्या चचेगाव (ता. कराड) येथील केळीच्या बागेची भेट देऊन पहाणी केली. येथील शेतकरी श्री. हनुमंत हुलवान, श्री.अरुण पवार यांच्या टाकी वस्ती या शेतातील साडे सात एकर क्षेत्रावरील केळीच्या बागेचे तौकते चक्रीवादळाने मोठे नुकसान झाले आहे. सदर शेतकऱ्यांनी काबाडकष्ट कष्ट करून फुललेली, हातातोंडाला आलेली केळीची बाग उद्ध्वस्त झाल्याने त्यांच्या समोर संकट उभे राहिले आहे.
यावेळी श्रीनिवास पाटील यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या. तसेच झालेल्या नुकसानीबद्दल शासनाकडून मदत मिळवून दिली जाईल असे आश्वासित केले.
No comments:
Post a Comment