पुणे माझा न्यूज प्रतिनिधी- पुणे विश्रांतवाडी:- कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन दिवसेंदिवस प्रयत्न करत आहेत तर एकीकडे हॉस्पिटल कोरोनाबधित रुग्णांना दुर्लक्ष करून मोकळे सोडत आहेत असाच काही प्रकार विश्रांतवाडी येथील विनोद मेमोरियल हॉस्पिटल मधील आहे मार्च महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ झाली आहे. शिवाय ही अतिशय गंभीर बाब असून जिल्ह्याचा मृत्यु व पॉझिटीव्ह दर वाढत चालला आहे या सर्व बाबींना पुण्यातील काही हॉस्पिटल्स जवाबदार आहेत जे रुग्णांना खुले आम सूट देऊन बाहेर सोडत आहेत
जिल्हा प्रशासन जनतेला मास्क व सोशल डीस्टनसिंग चे पालन करण्यास सांगत असून आता 10 दिवस कडक लॉकडाउन करण्याचा निर्णय प्रशासन घेत आहे अशा परिस्थितीत कोरोनाचा संसर्ग कसा रोखता येईल हा प्रश्न नागरिकांना पडला आहे काही दिवसांपूर्वी विश्रांतवाडी येथील विनोद मेमोरियल हॉस्पिटल येथील कोरोनाबधित रुग्ण हा खुले आम फिरत असताना आढळला आहे ज्याचे नाव अशोक उन्मघे असून हा रुग्ण विश्रांतवाडी मधील बाजार व मॉल मध्ये फिरत असताना आढळला आहे. तसेच वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर आज पुण्यात आढावा बैठक सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक सुरू आहे
या बैठकी दरम्यान विभागीय आयुक्त सौरभ राव म्हणाले "लॉकडाउन नको या भावना ठीक आहेत पण वाढती रुग्ण संख्या लक्षात घेत बेड उपलब्ध करून देणे हे भविष्यात कठीण होईल. वाढती रुग्ण संख्या नियंत्रणात आणण्यासाठी काहीतरी कडक निर्बंध घालावेच लागतील असे त्यांचे म्हणणे असून जो प्रकार पुण्यातील विश्रांतवाडी येथील विनोद मेमोरियल हॉस्पिटलमध्ये घडला आहे त्याचे काय.. अशा हॉस्पिटल वर प्रसशान कारवाई करणार का ?
असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे
जो प्रकार घडला त्याची तक्रार देखील महानगरपालिका वरिष्ठ आरोग्य अधिकारी डॉक्टर अंजली साबणे यांना कळविण्यात आली तरी देखील या हॉस्पिटल वर कारवाई नाही झाली फक्त विश्रांतवाडी पोलिसां मार्फत नोटीस बजावण्यात आली आहे
वरिष्ठ अधिकारी जर असे पाठबळ देत असतील तर कोरोना विषाणूचा संसर्ग कधीही थांबणार नाही असे किती ही लॉकडाउन करा किंवा अजून कडक निर्बंध घाला कोरोना हा कधीही थांबणार नाही म्हणून अशा हॉस्पिटल वर करवाई करून त्याचे लायसन्स रद्द करण्यात यावे अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत
प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत परंतु हे निर्बंध फक्त नागरिकांना आहेत की, सर्व हॉस्पिटल, कर्मचारी यांना देखील हे निर्बंध लागू आहेत हा सवाल नागरिकांच्या मना मध्ये फिरत आहेत " हा कोरोनाबधित रुग्ण अशोक उन्मघे याला विचारणा केली असता त्याने स्पष्ट सांगितले की हॉस्पिटल मधून मला बाहेर सोडले आहे पपेरची झेरॉक्स काढण्यासाठी बाहेर आला असे त्याने सांगितले आहे"
या हॉस्पिटल संदर्भात तक्रार देखील करण्यात आली होती परंतु आज पर्यंत कोणतेही कारवाई झाली नाही अशातच पालिका आयुक्त पुढील सात दिवस आस्थापने बंद ठेवण्याचा विचार करत आहेत याचा लोकांना फार त्रास होणार नाही असे म्हणतात एकीकडे असे हॉस्पिटल वाले कोरोनाबधित रुग्णांना बाहेर सोडून लोकांच्या जीवाशी खेळत आहेत त्यांच्यावर काय निर्बंध लावणार किंवा अशा हॉस्पिटल वर कोणती कारवाई करणार हे पाहावे लागणार आहे
आपला अभिप्राय नोंदविण्यासाठी आजच आम्हाला ई-मेल करा
punemajhanews@gmail.com
No comments:
Post a Comment