इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुपच्या वतीने शासनाचे अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या विरोधात बेमुदत सत्याग्रह
पुणे माझा न्युज प्रतिनिधी : कोंढवा येथील लोकप्रतिनिधीची कार्यप्रणाली चा अभ्यास केला तर फक्त आस्वासने निवडणूक पुर्विची आश्वासनांचा आपनास अनुभव आहेच. निवडणुकीच्या तोंडावर काय काय कामे केले (जुन्या कामाचे लोक आर्पन , पुन्हा निवडून दिले तर काय काय काम करणार हेच सांगीतले जाते.
संविधानातील कलम 21 नुसार नागरिकांना ,मुलभुत हक्क आणि अधिकार या मध्ये सर्व मुलभुत सुविधा उपलब्ध करून देणे हे प्रतिनिधी विसरूनच गेले आणि आपल्या पोटाचा विचार करत काम करत राहिले
लोक प्रतिनिधी हे जनतेचे सेवक असून ते जनता आणि प्रशासन मधील दुवा आहेत. ते जे कार्य अथवा आपल्या भागात सुधारणा करतात ते त्यांचे कर्तृत्व आहे. जनताच त्यांना सुविधा पुर्ण करण्याकरीता निवडुन देते
आपल्या भागातील वाहतूक, कचरा, पाणी सांडपाणी व्यवस्था, विज वितरण व्यवस्थीत आहे का?
जिवन जगण्याचा हक्क या अंतरगत आपणास जिवन जगता येत आहे का ?
आपल्या भागातील लोकप्रतिनिधी, नगरसेवक यांनी आपणास दिलेले आश्वासन पूर्ण केले का?
या प्रश्राचे उत्तर घेणे हे आपले संविधानीक हक्क आहे. या करिता असलम इसाक बागवान व सलंगनीत अराजकिय संघटना दिनांक 14/3/2021 रोजी सकाळी ठिक 11:00 पासुन "नागरी सुविधा "करीता आणि प्रभागातील नागरीकांच्या हक्का करीता बेमुदत सत्याग्रह करीत आहेत . (स्थळ - कोनार्क माँल, आशिर्वाद बिल्डिंग समोर कोंढवा पुणे - 48)
No comments:
Post a Comment