पुणे माझा न्यूज प्रतिनिधी: पुणे शहरात आजपासून सायंकाळी सहानंतर संचारबंदी लागू झाली असताना या संचारबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस तयारीतच होते आणि हे सुरू असतानाच विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक धक्कादायक खूनाचा प्रकार उघडकीस आला. या मध्ये सराईत गुन्हेगाराचा तीक्ष्ण हत्याराने सपासप वार करून खून करण्यात आला. शनिवारी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला असताच माहिती मिळाल्यानंतर विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास यंत्रणा कामाला लागली
सुमित जगताप (वय 33) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. मयत सुमित हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात मारहाण आणि दहशत निर्माण करणे असे अनेक गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
प्राथमिक मिळालेली माहिती अशी की, शनिवारी रात्रीच्या सुमारास सुमित जगताप हा लोहगाव परिसरात असताना चारचाकी वाहनातून आलेल्या काही व्यक्तींनी सुमितच्या चेहऱ्यावर तीक्ष्ण हत्यारांनी वार करून त्याच्या चेहऱ्याचा चेंदामेंदा केला होता. यामध्ये त्याचा जागेवरच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी चारचाकी वाहनातून पसार झाले. या घटनेने लोहगाव परिसरात मात्र एकच दहशत निर्माण झाली आहे.
खूनाचे नेमके कारण मात्र अद्यापही स्पष्ट झालेले नसले तरी हा खून मात्र पूर्ववैमनस्यातून झाला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे याबाबत विमानतळ पोलीस अधिक तपास करीत आहेत.
No comments:
Post a Comment