कोंढव्यात रात्री उशिरापर्यंत सुरू असलेले हॉटेलवर गुन्हा दाखल,
पुणे माझा न्यूज प्रतिनिधी पुणे : एकीकडे कोरोना संसर्ग वाढत असल्याने शहरात रात्री संचारबंदी लागू केली आहे तसेच सर्व नागरिकांना वेळो वेळी सूचना देखील देण्यात येत आहेत शासनाच्या नियमांना न जुमानता सगळे नियम धाब्यावर बसवत रात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरू ठेवल्या प्रकरणी कोंढव्यातील एन आय बी एम (NIBM) येथील एका हॉटेल चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर हॉटेल,रेस्टॉरंटला रात्री ११ पर्यंतच परवानगी देण्यात आली आहे. परंतु अनेक हॉटेल रात्री उशिरापर्यंत सुरु असल्याचे दिसून येत आहे.
पोलिसांनी आता हॉटेलचालका सोबतच उशिरापर्यंत हॉटेलमध्ये जेवण करणाऱ्या ग्राहकांवरही गुन्हा दाखल करण्यात सुरुवात केली आहे.
कोंढव्यात मध्यरात्रीपर्यंत सुरु असलेल्या ” बेहेस्त ” या रेस्टॉरंटवर कोंढवा पोलिसांनी कारवाई करुन हॉटेलचालकासह ११ जणांवर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
त्यात ४ ग्राहकांचा समावेश आहे. ग्राहकांवरही गुन्हे दाखल होत असल्याने खळबळ उडाली आहे.
कोंडवा परिसरात अनेक ठिकाणी पहाटे पर्यंत हॉटेल्स सुरु असतात आता प्रश्न निर्माण झाला आहे की, कोंडवा पोलीस या हॉटेलांवरती कारवाई करणार का...??
आपला अभिप्राय नोंदविण्यासाठी आम्हाला email करा - punemajhanews@gmail.com
No comments:
Post a Comment