पुणे माझा न्युज प्रतिनिधी : महाराष्ट्र राहुल गांधी विचारमंच तर्फे उत्तर प्रदेश येथे घडलेल्या घटनेचा निषेध करून मास्क वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष ईश्वर मोरे त्याच बरोबर सुरेश बरणे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घोडके, रमेश बागवे, मोहन जोशी, प्रज्वल बनकर हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते या कार्यक्रमात संघटनेच्या प्रदेश
कार्याध्यक्ष राधिका मखामले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले कि, हाथरस येथील बलात्कार व हत्या प्रकरणामुळे हे सिद्ध झाले आहे की उत्तर प्रदेश मध्ये योगी सरकार कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत पूर्णपणे अपयशी ठरलेले आहे, म्हणून उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रीय आणीबाणी घोषित करून त्या ठिकाणी राष्ट्रपती शासन म्हणजे राष्ट्रपती राजवट लागू करावे. त्याच बरोबर योगी सरकार ने राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे
यावेळी पुणे शहर अध्यक्ष अय्याज खान यांनी भाजप सरकार वर टीका करत सांगितले कि, या घटनेला भाजप सरकार जवाबदार आहे या सरकार ने कधीही कोणाचे चांगले केले नाही हे सरकार मनुवादी सरकार आहे या सरकार ने देशाला बरबाद केले आहे अशा सरकारचा त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला व येणाऱ्या काळात आजपासून ५० हजार लोकांपर्यंत मास्क वाटप करणार असल्याचे सांगितले यावेळी उपस्थित पुणे महिला अध्यक्ष कल्पना उनवणे , उपाध्यक्ष शोभा घायतडके, सरचिटणीस सुभद्रा धमगुंडे, चिटणीस कांचन जव्हेरी, पुणे शहर उपाध्यक्ष नरसिंह आंदोळी, इम्रान खान, इरफान शेख ,समीर सय्यद , सुभाष जाधव , सीमा पवार , कप्लना पांगसे, आरती व्हावळ आदी कार्यकर्ते उपस्थित होते
No comments:
Post a Comment