रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा हाथरस येथील बलात्कार व हत्या प्रकरणच्या विरोधात आक्रोश आंदोलन - PUNE MAJHA NEWS

Breaking

Post Top Ad

 


Saturday, 17 October 2020

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा हाथरस येथील बलात्कार व हत्या प्रकरणच्या विरोधात आक्रोश आंदोलन

 पुणे माझा न्युज प्रतिनिधी: दिनांक १६ ऑक्टोबर २०२० रोजी हाथरस येथील बलात्कार व हत्या प्रकरणच्या विरोधात आक्रोश आंदोलन पुणे जिल्हाधिकार्यालय पुणे येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे करण्यात आले.

आंदोलनाच्या प्रमुख मागण्या-

1. अजय मोहन उर्फ योगी आदित्यनाथ या इसमाला हाथरस येथील बलात्कार व हत्या प्रकरणी सह आरोपी म्हणून समाविष्ट करावे.

2. हाथरस येथील बलात्कार व हत्या प्रकरणाचा खटला उत्तर प्रदेशच्या बाहेर म्हणजे दिल्ली किंवा महाराष्ट्र येथे चालवावा. 

3. हाथरस येथील बलात्कार व हत्या प्रकरणाचा/गुन्ह्याचा तपास सीबीआयकडे(CBI) न देता सुप्रीम कोर्टाने स्वतः स्पेशल इन्वेस्टीगेशन टीम (SIT) द्वारे करावा. 

4. हाथरस येथील बलात्कार व हत्या प्रकरणामुळे हे सिद्ध झाले आहे की उत्तर प्रदेश मध्ये योगी सरकार कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत पूर्णपणे अपयशी ठरलेले आहे, म्हणून उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रीय आणीबाणी घोषित करून त्या ठिकाणी राष्ट्रपती शासन म्हणजे राष्ट्रपती राजवट लागू करावे. 


अशा मागण्या साठी आंदोलन करण्यात आले. प्रसंगी उपस्थित सतिश गायकवाड, राष्ट्रीय अध्यक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, अ‍ॅड तोसिफ शेख, राष्ट्रीय महासचिव, क्रांती सहाणे, सुहास बनसोडे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, अ‍ॅड सुरज जाधव, महाराष्ट्र महासचिव, अभिमन्यू सूर्यवंशी, महाराष्ट्र प्रदेश क्रीडा विभाग,  अ‍ॅड दिपक गायकवाड, माननीय आर.बी. जगताप, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर, सिद्धार्थ कांबळे पुणे शहराध्यक्ष, प्रसन्न कांबळे, महासचिव पुणे शहर, अमोल धनवडे, संघटक पुणे शहर, अ‍ॅड मोईन शेख, पंकज कांबळे, आदित्य किर्तनवडे, विशाल कांबळे, संतोष शिंदे, गणेश शेंडगे, श्रीकांत भोसले, मीरा कांबळे, कविता घाडगे, संतोष शिंदे, सविता सूर्यवंशी, मंगेश कांबळे, विजय जाधव, अनिल सूर्यवंशी, महेंद्र धनराव, सोनू अडसूळ, मौलाना वालिद खान, नदीम खान, अ‍ॅड स्वप्नील गिरमे, अ‍ॅड महेश गवळी, अ‍ॅड शारुक खान, अ‍ॅड दीप्ती काळे, गंगा चव्हाण, मीना जगताप, जालन्या वरून आलेले संजय कांबळे, दीनानाथ चव्हाण, मंगेश सोनकांबळे, मारुफा पठाण, मोहसीन शेख, तबरेझ अन्सारी, अ‍ॅड इक्बाल शेख, अ‍ॅड इस्माईल अन्सारी उपस्थित होते.

२९ सप्टेंबर रोजी झालेल्या हत्रस प्रकरणामुळे समाजकंटकांनी २९ सप्टेंबर रोजी झालेल्या खैरलांजी प्रकरणाची आम्हाला आठवण करून दिली - अ‍ॅड तोसिफ शेख, 

देशात संविधान वाचण्यासाठी जे जे करावे लागेल त्यासाठी आम्ही कोणत्याही खेळायला जाऊ आणि देशात संविधानाचा राज्य प्रस्थापित करू- सतिश गायकवाड

न्याय देणार नसाल तर न्याय मिळवण्यासाठी जे जे करावे लागेल ते शासकीय संस्थांच्या विरोधात करण्यासाठी संघर्ष करू आणि न्याय मिळवू- क्रांती सहाणे


No comments:

Post a Comment

Post Top Ad