पुणे माझा प्रतिनिधी पुणे : पुणे शहरात अशा प्रकारच्या अनेक घटना घडल्या आहेत आज मैत्रीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना पुण्यातील कॅम्प परिसरात घडली आहे मित्रांची भांडणे कधी कोणत्या स्थरावर जाईल याची कल्पना देखील करू शकणार नाही .
कॅम्प परिसरात नागरिकांमध्ये उडाली खळबळ या परिसरात घबराटीचे वातावरण घटना स्थळी पोलसांनी दिली भेट
दोन मित्रांमध्ये किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणाच्या रागात मित्राचा चाकूने वार करुन त्याचा खून केल्याची घटना काल रात्री ८ वाजता पुणे लष्कर परिसरात घडली आहे.
उबेद बाबू कुरेशी वय २८ भीमपूरा गल्ली नं २३ कॅम्प पुणे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याप्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी नबील शब्बीर बेलीम याला अटक करण्यात आली आहे
कॅम्पातील बाबजान चौकात दोघे बसले होते. यावेळी त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. वादाचे रूपांतर बाचाबाचीत झाले
यावेळी नबील याने उबेद याच्यावर थेट चाकूने सपासप वार केले. यात तो गंभीर जखमी झाला. गर्दीच्या ठिकाणी हा प्रकार घडला.
सदरील माहिती लष्कर पोलिसांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत भोसले यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
तसेच त्याला रुग्णालयात नेले.पण उबेदचा त्यापूर्वीच मृत्यू झाला होता. पोलिसांनी आरोपी नबील याला ताब्यात घेतले. अधिक तपास लष्कर पोलीस करत आहेत.
No comments:
Post a Comment